Baramati Raju Shetti : विरोधक ईडी, इन्कम टॅक्स आणि भोंग्यांच्या पुढे जायला तयार नाहीत; राजू शेट्टींचा बारामतीत हल्लाबोल

राज्यात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न (Farmers problem) आहेत. ऊस गाळपाविना शिल्लक, महापूरग्रस्तांना तोकडी मदत दिली गेली, सत्ताधारी मात्र वादामध्ये मश्गूल आहेत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली आहे.

Baramati Raju Shetti : विरोधक ईडी, इन्कम टॅक्स आणि भोंग्यांच्या पुढे जायला तयार नाहीत; राजू शेट्टींचा बारामतीत हल्लाबोल
राजू शेट्टीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 12:04 PM

बारामती, पुणे : राज्यात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न (Farmers problem) आहेत. ऊस गाळपाविना शिल्लक, महापूरग्रस्तांना तोकडी मदत दिली गेली, सत्ताधारी मात्र वादामध्ये मश्गूल आहेत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली आहे. ते बारामतीत बोलत होते. केंद्र तसेच राज्य सरकारवर टीका करताना ते म्हणाले, की एफआरपीचे तुकडे करून शेतकऱ्यांचे नुकसान केले जात आहे. वीजेचा लपंडाव सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला. शिरोळमध्ये दुर्घटना घडली. माझा वर्गमित्र सुहास याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र सरकारला याचे काहीही देणेघेणे दिसत नाही. केंद्र सरकारच्या धोरणामुळे रासायनिक खतांचे (Chemical Fertilizers) दर वाढले आहेत. इंधनाचे दर वाढल्यामुळे मशागतीचा खर्च वाढला आहे. टनामागे 214 रुपये खर्च वाढला आहे. उसाचा दर आता परवडत नाही, असा हल्लाबोल राजू शेट्टी यांनी केला आहे.

‘आळीमिळी गुपचिळी अशी अवस्था’

ते पुढे म्हणाले, की कोरोना काळात शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे. रोजगाराचे प्रश्न निर्माण झाले आहेत. अनेकांना महाविद्यालयीन शिक्षण सोडावे लागले. आरोग्य, म्हाडा पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान हे प्रश्न आपल्यासमोर आहेत. मात्र विरोधक ईडी, इन्कम टॅक्स आणि भोंग्यांच्या पुढे जायला तयार नाहीत. केंद्रातल्या अपयशावर विरोधक गप्प आहेत. तर राज्यातल्या प्रश्नावर इथले विरोधक गप्प आहेत. एकूणच आळीमिळी गुपचिळी अशी अवस्था असल्याची टीका त्यांनी केली आहे.

‘त्यांच्यासोबत कसे जाणार?’

ज्यांनी 800 शेतकऱ्यांचा बळी घेऊन कृषी कायदे मागे घेतले, ज्यांच्यामुळे रासायनिक खतांच्या किंमती वाढल्या, त्यांच्यासोबत कसे जाणार, असा सवाल त्यांनी केला. पवारसाहेब 10 वर्षे कृषीमंत्री होते. त्यांनी उसाबाबत योग्य निर्णय घेतला असता तर आज परिस्थिती वेगळी असती. या ऊस उत्पादकांमुळेच त्यांच्या पुतण्या आणि नातवांचे कारखाने झाले, असे शेट्टी म्हणाले.

महाविकास आघाडीवर टीका

11 फेब्रूवारीला शरद पवार यांना पत्र लिहिले होते. विविध प्रश्न मांडले होते. सरकारच्या धोरणाबद्दल आक्षेप नोंदवला होता. सोनिया गांधी आणि राहुल गांधींनाही पत्र लिहिले होते. शेतकऱ्यांवर अन्यायकारक निर्णय घेतले. मात्र कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे कार्यकारिणीशी बोलून मी महाविकास आघाडीतून बाजूला व्हायचा निर्णय घेतला, असे ते म्हणाले.

‘हे कारणच तकलादू’

भारनियमन, वीजटंचाई यासाठी कोळसा कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. मात्र हे कारणच तकलादू आहे. खरेच जर केंद्र सरकार अन्याय करत असेल, तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे आपली भूमिका मांडली पाहिजे, असे राजू शेट्टी म्हणाले.

आणखी वाचा :

Video Sanjay Raut | हिंदुत्वाच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचं लक्ष्य, मुख्यमंत्रीही करणार विदर्भाचा दौरा; संजय राऊतांची घोषणा

Prashant Kishor: प्रशांत किशोर यांच्याकडून काँग्रेसला कमबॅकची पंचसूत्री, काँग्रेस भाजपला पराभूत करणार?; वाचा नेमका प्लान

मोठी बातमी! धनंजय मुंडेंकडून खंडणी मागितल्याप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा, खंडणी मागणारी महिला कोण?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.