Raju Shetty : नितीन गडकरींनी केलेल्या वक्तव्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी घेतला खरपूस समाचार, म्हणाले व्वा! गडकरी साहेब

व्वा! गडकरी साहेब एफ आरपीपेक्षा जास्त रक्कम दिली तर साखर कारखानदार आत्महत्या करतील का? तसेच शेतकऱ्याला स्वतःच्या शेतातील ऊसापासून इथेनॉल तयार करायला परवानगी दिली? तरीही साखर कारखानदार आत्महत्या करतील? असा उपरोधक सवाल राजू शेट्टी यांनी नितीन गडकरींना केला आहे

Raju Shetty : नितीन गडकरींनी केलेल्या वक्तव्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी घेतला खरपूस समाचार, म्हणाले व्वा! गडकरी साहेब
राजू शेट्टी आणि नितीन गडकरी Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 9:33 PM

पुणे : राज्यातील ऊस (Sugarcane) उत्पादकावर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रीया दिली होती. त्यावर तिखट प्रतिक्रीया देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी शरद पवार आणि महाविकास आघाडी सरकारवर प्रहार करत टीकेचे झोड उडवून दिली होती. त्यानंतर आता राजू शेट्टी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांच्या एका विधानावर टीका केली आहे. तर शेट्टी यांनी गडकरी यांच्या त्याविधानाचा पुण्यात खरपूस समाचार घेतला आहे. नितीन गडकरी सोलापुरात विविध राष्ट्रीय महामार्गांच्या उद्घाटन सोहळ्यात ऊस जर असाच जास्त लावत राहाल तर एक दिवस तुम्हाला आत्महत्या करायची वेळ येईल असे म्हटले होते.

नितीन गडकरींचे वक्तव्य

नितीन गडकरी यांनी सोलापुरात, जर शेतीला पाणी उपलब्ध करुन दिलत तर शेतकऱ्याचं उत्पन्न अडीच पटीने वाढल्याशिवाय राहणार नाही. एकेकाळी सोलापूर जिल्हा हा दुष्काळी जिल्हा होता. परंतू आताच मला कळाले की सोलापूरात यंदा 22 लाखांचा ऊस गाळप झाला. पण माझी एक गोष्ट लक्षात ठेवा ऊस जर असाच जास्त लावत राहाल तर एक दिवस तुम्हाला आत्महत्या करायची वेळ येईल. त्यावर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी टीका केली. तसेच त्यांनी गडकरींवर हल्ला करताना प्रश्नांची सरबत्ती केली.

राजू शेट्टींचा उपरोधक सवाल

त्यात त्यांनी, व्वा! गडकरी साहेब एफ आरपीपेक्षा जास्त रक्कम दिली तर साखर कारखानदार आत्महत्या करतील का? तसेच शेतकऱ्याला स्वतःच्या शेतातील ऊसापासून इथेनॉल तयार करायला परवानगी दिली तरीही साखर कारखानदार आत्महत्या करतील. शेतकऱ्याने शेतातील ऊसापासून स्वतः इथेनॉल तयार करून ट्रॅक्टरसाठी वापरलं तर पेट्रोलियम कंपनीवाले ही आत्महत्या करतील. पाकिस्तानातील साखर आयात थांबवली तर तुमचे उद्योजक मित्र आत्महत्या करतील, असे म्हटले आहे. तर जे आजारी पाडलेला सहकारी साखर कारखाना पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात दिला तर तुमचे राजकीय मित्र आत्महत्या करतील असेही म्हटले आहे. आणि जर हे नको असेल तर ऊस उत्पादकाने आत्महत्या केलेली केव्हा ही चांगलीच नाही का? असा उपरोधक सवाल राजू शेट्टी यांनी नितीन गडकरींना केला आहे.

इतर बातम्या :

Central and Western Railway : मध्य रेल्वे मान्सूनच्या तयारीसाठी सज्ज; पावसाळ्याशी संबंधित सर्व कामे उद्दिष्टाच्या तारखेपूर्वी पूर्ण करावीत, महाव्यवस्थापकांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Navneet Rana : संजय राऊतांचे नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप, राणांनी डी गँगशी संबंधित लखडावालाकडून कर्ज घेतलं?

Gunratna Sadavarte : जेलमधून बाहेर आल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंनी मानले भाजप नेत्यांचे आभार, म्हणाले माझी हत्या झाली तर…

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.