राहुल गांधी यांच्या अडचणी वाढणार? पुणे न्यायालयात याचिका
स्वातंत्र्यवीर सावरकर प्रकरणात राहुल गांधी यांच्या अडचणी वाढणार आहे. या प्रकरणावरुन भाजप व शिवसेनेनंतर महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला ठाकरे गटाने राहुल यांच्या या विधानाचा समाचार घेतला होता. आता न्यायालयात याचिका दाखल झाली आहे.
प्रदीप कापसे, पुणे : सुरत न्यायालयाच्या निर्णयानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली होती. यावेळी त्यांनी आपण माफी मागणार नसल्याचे स्पष्ट करताना त्यांनी नवीन वाद निर्माण केला होता. मी बोलतच राहणार. मला तुरुंगात टाका. माझी खासदारकी रद्द करा. कायमस्वरुपीही माझं लोकसभेचं सदस्यत्व घालवलं तरी मी बोलतच राहणार. मी माफी मागणार नाही. कारण मी गांधी आहे, सावरकर नाही, असं राहुल गांधी म्हणाले होते. त्यावरुन महाराष्ट्रातून राहुल गांधी यांच्यांवर चौफर टीका होत आहे. भारतीय जनता पक्ष व शिवसेनेबरोबर अगदी महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला ठाकरे गटाने राहुल यांच्या या विधानाचा समाचार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसनेही या प्रकरणी राहुल यांच्या विरोधात भूमिका घेतली. राहुल गांधी यांची अडचण येथेच थांबली नाही, अजून त्यांच्या अडचणीत भर पडणार आहे.
पुणे न्यायालयात याचिका
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात पुणे सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे. आता या दाव्यावर 15 एप्रिल रोजी पुणे न्यायालयात सुनावणी होणार आहे. यामुळे राहुल गांधी यांच्यासमोर अडचणी वाढणार आहेत.
काय होते राहुल गांधी यांचे ते भाषण
राहुल गांधी यांनी इंग्लंडमध्ये भाषण केलं होतं. त्यात ते म्हणाले होते की, एका मुस्लिम व्यक्तीला सावरकर आणि त्यांचे पाच सहा मित्र मारत होते. तेव्हा सावरकरांना आनंद होत होता. असं त्यांनी पुस्तकात लिहिले आहे, असं राहुल गांधी म्हणाले होते. राहुल गांधी यांची ही कथा काल्पनिक आहे. यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मानहानी होत आहे, असा दावा करत सात्यकी सावरकर न्यायालयात गेल्या आहेत.
काय होते प्रकरण
खासदारकी रद्द झाल्यानंतर, राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली आणि मोदी सरकारला इशारा दिला. मोदी नावाचे व्यक्ती चोर कसे ? या वक्तव्यावरुन राहुल गांधींना मानहानीच्या प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा झाली..कोर्टात राहुल गांधींनी माफी मागण्यास नकार दिला, नाही तर राहुल गांधींना शिक्षा झाली नसती आणि खासदारकीही गेली नसती…मात्र मी सावरकर नाही तर राहुल गांधी आहे…त्यामुळं माफी मागणार नाही असं म्हणत राहुल गांधींनी म्हटले होते. राहुल गांधी वारंवार सावरकर यांच्या विरोधातील वक्तव्य करतात. यामुळे सावरकर प्रेमी संतापले आहेत.