रुग्णालयात रुग्णांसोबत गैरवर्तन केल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई करा ; महापौर उषा ढोरे भडकल्या

उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसमवेत तसेच त्यांच्या नातेवाईकांसोबत काही कर्मचारी सौजन्याने वागत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा तक्रारी आल्याने आपल्या चांगल्या कामावर पाणी पडते. म्हणून रुग्णालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवा देताना नागरिकांशी सौजन्याने वागले पाहिजे

रुग्णालयात रुग्णांसोबत गैरवर्तन केल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई करा ; महापौर उषा ढोरे भडकल्या
Usha dhore
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 5:31 PM

पिंपरी- शहरातील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये शहरातील तसेच शहराबाहेरील रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र रुग्णालयाचे काही कर्मचारी रुग्ण आणि नातेवाईकांसमवेत सौजन्याने वागत नाही अशा तक्रारी येत आहेत. ही बाब योग्य नसून रुग्ण व नातेवाइकांच्या सोबत अशा प्रकारची वर्तणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिला आहे.

महापौर माई ढोरे यांनी आज यशवंतराव स्मृती रुग्णालयाला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी महापौरांच्या समवेत उपमहापौर हिराबाई घुले, शहर सुधारणा सभापती अनुराधा गोरखे, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, यशवंतराव स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.राजेंद्र वाबळे, ब्रदर विजय दौंडकर आदी उपस्थित होते.

प्रसूती कक्षात साधला संवाद रुग्णालयातील प्रसुती कक्षामध्ये जाऊन रुग्णांसोबत ढोरे यांनी संवाद साधला. रुग्णालयाच्या व्यवस्थापनाद्वारे रुग्णांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दल देखील त्यांनी विचारणा केली. वायसीएम रुग्णालयाने शहर तसेच शहराबाहेरील रुग्णांना देखील उत्तम सेवा दिली आहे. रुग्णसेवेबाबत या रुग्णालयाने नावलौकीक मिळवला आहे. या रुग्णालयाबाबत जनतेच्या मनात आदर आणि आस्था आहे. विविध आजारांवरील उपचाराबरोबरच दुर्मिळ शस्त्रक्रिया देखील या रुग्णालयात झाल्या आहेत. कोविड काळात या रुग्णालयामार्फत दिलेली सेवा वाखाणण्यासारखी असून वायसीएम रुग्णालयाची प्रतिमा यामुळे उंचावली आहे.

मात्र या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसमवेत तसेच त्यांच्या नातेवाईकांसोबत काही कर्मचारी सौजन्याने वागत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा तक्रारी आल्याने आपल्या चांगल्या कामावर पाणी पडते. म्हणून रुग्णालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवा देताना नागरिकांशी सौजन्याने वागले पाहिजे असे महापौर ढोरे म्हणाल्या. याबाबत रुग्णालय प्रमुखांनी व्यक्तीश: लक्ष घालावे. नागरिकांशी उध्दट वर्तन करणाऱ्या तसेच सौजन्याने न वागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी असे आदेश महापौर ढोरे यांनी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांना दिले.

भविष्यवाणी करा पण 5 वर्ष मविआ सरकार टिकणार – नवाब मलिक

कोरोनाच्या नव्या अवतारानंतर सेन्सेक्समध्ये 7 महिन्यांतील सर्वात मोठी घसरण, सोने-चांदी महागले

आता नितीन गडकरी म्हणलेत म्हणल्यावर तरी होईलच, मुख्य रस्त्याच्या चौपदरी करणाबाबत लातूरकरांना आश्वासन

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.