92 किलो सोन्याची मूर्ती असलेले जिजाऊंचे मंदिर उभारणार, तयारी झाली सुरु
Rajgad chhatrapati shivaji maharaj and jijabai : शिवाजी महाराज यांचासारखा पराक्रमी राजा घडवणाऱ्या आई जिजाऊ यांचे मंदिर उभारण्यात येणार आहे. या मंदिराच्या शुभारंभासाठी अनेकांना निमंत्रण दिली जात आहे. ६ जून रोजी हा कार्यक्रम होणार आहे.
प्रदीप कापसे, पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांचासारखा राजा घडवणाऱ्या आई जिजाऊ यांचे भव्य मंदिर उभारण्याची तयारी सुरु झाली आहे. या मंदिरात ९२ किलो सोने असलेले जिजाऊ यांची मूर्ती असणार आहे. जिजाऊंचे मंदिराच्या शुभारंभासाठी अनेकांना निमंत्रण पाठवले जात आहे. राजगडाच्या पायथ्याशी हे मंदिर असणार आहे. 6 जूनला पाल गावात मंदिराच्या कामाचा होणार शुभारंभ करण्यात येणार आहे. यामुळे राज्यात प्रथमच जिजाऊंचे भव्य मंदिर उभे राहणार आहे.
92 किलो सोन्याची मूर्ती
राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा या गावात झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले, मात्र त्यासाठी त्यांना माँ साहेब जिजाऊ यांनी प्रेरित केले. जिजाऊंनीच त्यांना स्वराज्याची वाट दाखवली. याच प्रेरणेमुळे स्वराज्याचा पाया रचला गेला. त्यामुळे जिजाऊंचा मंदिर राजगडाच्या पायथ्याला उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या मंदिरात 92 किलो सोन्याची जिजाऊंची मूर्ती असणार आहे.
अजित पवार यांना निमंत्रण
शिवाजी द मँनेजमेंट गुरु पुस्तकाचे लेखक शिवव्याख्याते नामदेव जाधव यांनी यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. 6 जूनला पाल गावात मंदिराच्या कामाचा होणार शुभारंभ होणार आहे. त्यासाठी त्यांनी अजित पवार यांना निमंत्रण दिलं. तसेच जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरूज हे पुस्तक अजित पवार यांना दिलं भेट दिले.
राजगड होती पहिली राजधानी
राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठी राज्याची पहिली राजधानी होती. राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. एवढी सुरक्षितता होती,म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली. त्याच ठिकाणी जिजाऊंचे मंदिर उभारले जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांना गुरूस्थानी त्यांचे वडील शहाजीराजे, राजमाता जिजाऊचं होत्या. त्यांनीच त्यांना तलवारबाजी, दांडपट्टा तसेच कला आणि राजकारणाचे धडे दिले. त्यांना सर्व विद्यांत शिवाजी महाराज यांनी निपुण केले होते. यामुळे छत्रपती घडले.