AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक ! पुणे बोर्डाची गोपनीय कागदपत्रं घेऊन जाणारा टेम्पो आगीच्या भक्षस्थानी ; 12वी परिक्षेच्या प्रश्नपत्रिका असल्याची खात्रीलायक माहीती 

भोपाळ येथून पुणे विद्यापिठाची गोपनीय कागदपत्रे घेऊन निघालेल्या टेम्पोला संगमनेर तालुक्यातील चंदनापूरी घाटानजीक अचानक आग लागली. गाडीला आग लागताच ड्रायव्हर आणि क्लिनर गाडी थांबवून खाली उतरत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग इतकी भीषण असल्याने आग विझवण्यात ते असमर्थ ठरले.

धक्कादायक ! पुणे बोर्डाची गोपनीय कागदपत्रं घेऊन जाणारा टेम्पो आगीच्या भक्षस्थानी ; 12वी परिक्षेच्या प्रश्नपत्रिका असल्याची खात्रीलायक माहीती 
pune borad
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 5:25 PM

पुणे – भोपाळ येथून पुणे बोर्डाची (Pune borad )कागदपत्रे घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अचानक आग (Tempo suddenly fires) लागल्याने 12 वीच्या प्रश्नपत्रिका या आगीत जळून खाक झाल्याची खात्रीलायक माहीती समोर आलीय. पहाटे साडे सहा वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यात पुणे – नाशिक महामार्गावर चंदनापूरी घाटानजीक ही घटना घडलीय आहे. येत्या 4 मार्च रोजी होणाऱ्या 12 वीच्या (12th exam ) परीक्षेवर मात्र कोणताही परिणाम होणार नसल्याचं पुणे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केल आहे. भोपाळ येथून पुणे विद्यापिठाची गोपनीय कागदपत्रे घेऊन निघालेल्या टेम्पोला संगमनेर तालुक्यातील चंदनापूरी घाटानजीक अचानक आग लागली. गाडीला आग लागताच ड्रायव्हर आणि क्लिनर गाडी थांबवून खाली उतरत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग इतकी भीषण असल्याने आग विझवण्यात ते असमर्थ ठरले.

शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

टेम्पोच्या समोरच्या भागात अचानक आगीचे लोळ सुरू झाले आणि बघता बघता संपूर्ण गाडीने पेट घेतला. महामार्ग पोलीसांनी संगमनेर नगरपालिका आणि साखर कारखान्याच्या अग्निशमन बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत गाडीतील बहुतांश कागदपत्रे आगीत भस्मसात झाली होती. पोलीसांनी घटनेचा तपास सुरु केला असून शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती संगमनेरचे डिवायएसपी राहुल मदने , यांनी दिली आहे.

नियोजित दिवशीच परीक्षा होणार

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पुणे माध्यमिक – उच्च माध्यमिक बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी , सचिव अशोक भोसले , विभागीय मंडळाच्या सचिव अनुराधा ओक , सहाय्यक सचिव पोपट महाजन घटनास्थळी दाखल झाले. पुणे बोर्डाचे गोपनीय कागदपत्रं आगीत जळाल्याची माहिती पुणे बोर्ड अध्यक्ष गोसावी यांनी दिली आहे . आगीमध्ये बारावीचे पेपर भस्मसात झाल्याने परिक्षा होणार कि नाही ? यावर बोलताना शरद गोसावी यांनी म्हणटलय की आम्ही या परिस्थितीचा तोंड देण्यासाठी तयार असून विद्यार्थ्यांनी परिक्षेची तयारी करावी नियोजित दिवशीच परीक्षा होणार असल्याचे स्पष्टकेलं आहे.

शरद पवार मोठे नेते- आशिष शेलार

‘इथे मीच गुरू, मीच शिष्य..’; ‘चाबुक’ चित्रपटात समीर धर्माधिकारी अनोख्या भूमिकेत

नवाब मलिक यांना ईडी कार्यालयात घेऊ आलेल्या कार, पाहा एक्सक्सुझिव्ह दृश्यं

'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी.
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे.
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.