TET Exam papers | परीक्षा परिषदेचा ढिसाळ कारभार ; टीईटी परीक्षेच्या उत्तरपत्रिका पत्र्याच्या गोडाऊनमध्ये पडून
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे केवळ शिक्षक भरतीचा नव्हे तर शिष्यवृत्ती परीक्षा, टायपिंग परीक्षा, डी. एड परीक्षांसह अनेक परीक्षा घेतल्या जातात. विविध परीक्षा केंद्रातून आलेल्या उत्तरपत्रिका परिषदेच्या गोडाऊनमध्ये जमा केल्या जातात. मात्र सर्व उत्तरपत्रिका पुरेश्या जागेच्या अभावी पत्र्याच्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आल्या आहेत.
पुणे – शिक्षक पात्रता परीक्षेतील (TET exam scam )घोटाळा उघड झाल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा (Maharashtra State Examination Council) ढिसाळ कारभार समोर आला आहे. परिषदेने टीईटी परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका व महत्त्वाची कागदपत्रे चक्क पत्र्याच्या गोडाऊनमध्ये ठेवल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे केवळ शिक्षक भरतीचा नव्हे तर शिष्यवृत्ती परीक्षा, टायपिंग परीक्षा, डी. एड परीक्षांसह अनेक परीक्षा घेतल्या जातात. विविध परीक्षा केंद्रातून आलेल्या उत्तरपत्रिका परिषदेच्या गोडाऊनमध्ये जमा केल्या जातात. मात्र सर्व उत्तरपत्रिका पुरेश्या जागेच्या अभावी पत्र्याच्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे लाखो मुलांचे भविष्य अंधारात असल्याचे दिसून आले आहे.
राज्य शासनाने दुर्लक्ष
राज्य शासनाचे शिक्षण परिषदेकडे असलेल्या दुर्लक्ष , अधिकाऱ्यांचा कामातील गलतानपणा याचा वेळी वेळी प्रत्यय येत आहे. जागेच्या आभावामुळे उत्तर पत्रिका गोडाऊन मध्ये ठेवण्यात येत असल्याचे कारण परिषद देत असली तरी जागेच्या उपलब्धतेसाठी सरकार आणि परिषद दोघांकडूनही उदासिनता असल्याचे दिसून येते.
सकारात्मक निर्णयाचा आभाव
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून 2016 मध्ये सर्व सुविधांनी युक्त अशी सुसज्ज इमारत बांधण्याचा प्रस्ताव तयार केला. त्यानंतर राज्य शासनाकडून निधी न घेता स्वतः निधी उपलब्ध करत गोडाऊन बांधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेण्यात आली. मात्र अदयाप सुसज्ज अशी मजबूत इमारत बांधण्याची प्रक्रिया सुरु झालेली नाही. मात्र तात्पुरती सोय म्हणून पत्र्याचे गोडाऊन उभारण्यात आले.
नुकसानाची जबाबदारी कोण घेणार परीक्षा परिषदेने घेतलेल्या विविध परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची खोकी या पत्र्याच्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आले आहेत. पावसात या उत्तरपत्रिका भिजल्या, या उत्तरपत्रिकांना वाळवी लागली. आग लागण्यासारख्या घटना घडलया तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांचे होणार नुकसानाची जबाबदारी कोण घेणार. परिषेदेकडे पुरेशी जागा नाही हे कारण देत परीक्षा परिषदेच्या बाहेरील मोकळ्या जागेतही सीलबंद पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. यातील एखादी पेटी घाळ झाली तर त्याला जबाबाद कोण ?
दिल्लीतही घेतली गंभीर दखल
शिक्षक पात्रता परीक्षेच्या घोटाळ्याची आता दिल्लीतही दाखल घेण्यात आली आहे. परीक्षेच्या आयोजनातील त्रुटींबाबत दिल्लीच्या राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेत (एनसीटीई) चर्चा सुरु झाली आहे. परीक्षेच्या स्वरूपात सुधारणा करण्यासाठी एनसीटीईने आधीच एका समिती गठन केली होती. मात्र तिच्या कामाला आता टीईटी घोटाळ्यानंतर वेग आला असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण खात्याचे अपर सचिव डी. के. चतुर्वेदी यांनी दिली आहे.
TET Scam | टीईटी घोटाळ्यात GA कंपनीचा संचालक सौरभ तिवारीला अटक