AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ते शिरोळचे त्या पुण्याच्या; वय वर्षे ७५-७०, मनं जुळली नि एकत्र आले

ज्येष्ठ नागरिक म्हणून जीवन जगत असताना अशी काही वेळ येईल, याची त्यांनी कधी कल्पना केली नव्हती. पण, आता ते सुखी आहेत. त्यांच्या आनंदात भर पडली आहे. आनंदी जीवन जगण्याचा मंत्र त्यांनी स्वीकारला आहे.

ते शिरोळचे त्या पुण्याच्या; वय वर्षे ७५-७०, मनं जुळली नि एकत्र आले
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 11:38 AM

कोल्हापूर : केव्हा कुणाचं मन कुणासोबत जुळेल, याचा काही नेम नाही. बाबूराव आणि अनुसया यांचेही तसेच झाले. बाबूराव हे शिरोळचे. पत्नी साथ सोडून देल्यानंतर त्यांनी वृद्धाश्रमाची वाट धरली. अनुसया या पुण्याच्या त्यांचे पती गेले. त्यानंतर त्याही एकाकी होत्या. मनात दुःख होतं. त्यांनीही वृद्धाक्षमाचा मार्ग पत्करला. वृद्धाश्रमात राहत असताना दोघांचीही मनं जुळून आली. पण, हिंमत होत नव्हती. शेवटी मनं मोठी केली. दोघांनीही विचार करून निर्णय घेतला. त्यांना साथ मिळाली. त्यामुळे त्यांचे लग्न होऊ शकलं. ज्येष्ठ नागरिक म्हणून जीवन जगत असताना अशी काही वेळ येईल, याची त्यांनी कधी कल्पना केली नव्हती. पण, आता ते सुखी आहेत. त्यांच्या आनंदात भर पडली आहे. आनंदी जीवन जगण्याचा मंत्र त्यांनी स्वीकारला आहे.

दोघेही राहत होते वृद्धाश्रमात

शिरोळ येथील जानकी वृद्धाश्रमातील अशाच दोन समदुःखी वृध्दांनी वयाच्या सत्तरीत विवाह बंधनात अडकले आहेत. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वृध्दाश्रम चालक बाबासाहेब पुजारी यांनी कायदेशीर बाबींची पूर्तता करून धुमधडाक्यात लग्न लावून दिले. त्यामुळे या वेगळ्या लग्नाची खूपच चर्चा रंगली आहे. अनुसया शिंदे वय 70 मूळ रा.वाघोली,जि.पुणे अशी वृध्द नववधू तर वराचे बाबूराव पाटील वय 75, रा. शिवनाकवाडी, ता.शिरोळ नाव आहे. दोघेही दोन वर्षांपासून घोसरवाड येथील जानकी वृद्धाश्रमात राहतात.

मन मोकळे करता करता जुळलं

दोघेही शरीराने स्वावलंबी असले तरी मानसिकदृष्ट्या खचलेल्या होते. दोघांचेही साथीदारांचे निधन झाले. त्यामुळे या समदुःखी वृध्दांनी एकमेकांच्या आयुष्यातील दुःखाचा पाढा वाचून मन मोकळे करता करता दोन्ही मने जुळली. लग्नाच्या बंधनातून एकत्र येण्याचा निर्णय घेतला. दोघांचीही तयारी असल्याने व कायदेशीर सल्ला घेवून वृध्दाश्रमातच मांडव घालून दिला. ग्रामस्थ व प्रमुख लोकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पद्धतीने थाटात लग्न लावून देत वृद्धांची इच्छा पूर्ण केली. त्यामुळे या वृध्द जोडप्यांचा लग्न खूपच चर्चेची ठरली आहे.

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.