AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune crime | पुण्यात स्वतःच्या ४ वर्षाच्या बालकाच्या अपहरणाचा बनाव रचत आईनेचे केले हे कृत्य ; 24 तासात पोलिसांनी केला घटनेचा उलगडा

माझ्या चार वर्षीय बालकाचे अपहरण झाल्याची तक्रार संबंधित आरोपी महिलेनं कोथरूड पोलिसात दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास करत असताना आरोपी महिलेच्या बोलण्यात विसंगती आढळून येत होती. पोलिसांनी अधिक सखोल चौकशी केल्यानंतर घटनेचा उलगडा झाला.

Pune crime | पुण्यात स्वतःच्या ४ वर्षाच्या बालकाच्या अपहरणाचा बनाव  रचत आईनेचे केले हे कृत्य ; 24 तासात पोलिसांनी केला घटनेचा उलगडा
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 5:35 PM

पुणे – शहरात स्वर्णव चव्हाण या बालकाच्या अपहरणाची घटना ताजी असतानाच शहरातील कोथरूड परिसरातून (kothrud area)आईनेच स्वतःच्या अवघ्या चार वर्षाच्या बालकाच्या अपहरणाचा (Abduction) डाव रचून त्याला विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पैश्याच्या हव्यासापोटी आईने हे कृत्य केले आहे. या विक्री केलेल्या चार वर्षीय मुलाची पोलिसांनी(Police) सुटका केली आहे. या प्रकरणात कोथरूड पोलिसांनी अपहृत मुलाच्या आई सोबत आठ आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी या अवघ्या 24 तासात ही सुटका केली आहे. आईनेच मुलाची एक लाख रुपयांना विक्री केल्याचे तपासात समोर आले आहे.

अशी घडली घटना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोथरूड परिसरातून माझ्या चार वर्षीय बालकाचे अपहरण झाल्याची तक्रार संबंधित आरोपी महिलेनं कोथरूड पोलिसात दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास करत असताना आरोपी महिलेच्या बोलण्यात विसंगती आढळून येत होती. पोलिसांनी अधिक सखोल चौकशी केल्यानंतर घटनेचा उलगडा झाला. प्रियंका गणेश पवारअसे आरोपीचे नाव आहे. आरोपी प्रियांकाला दोन मुले आहेत. तिचा नवऱ्यापासून ग घटस्फोट झाला आहे ए. पैश्याची चणचण भासल्याने स्वतःच्या एक मुलाचं अपहरण करून विकण्याचा डाव रचला. यासाठी तिने काही जणांना सोबत घेऊन 1 लाख रुपयांमध्ये लाहान मुलाची विक्री केली. पुढे दुसऱ्या पार्टीने दुसऱ्याला 1 लाख 60 हजारांमध्ये रायगड जिल्ह्यात विक्री केली मात्र हा संपूर्ण कट पोलिसांनी 24 तासात उघडकीस आणला.

मुलांना सांभाळणे शक्य नसल्याने केली विक्री पोलिसांनी आरोपी महिलेसह आठ जणांना अटक केली आहे. तपासा दरम्यान घटस्फोटानंतर मुलांना सांभाळणे शक्य नसल्याने मुलाची विक्री केल्याची माहिती आरोपीने दिली आहे. पोलीस या घटनेचा आणखी तपास करत आहेत. अपहरण झालेल्या मुलाची सुटका करून पोलिसांनी त्याला वडील गणेश पवार याच्या ताब्यात दिले आहे.

#BoycottHyundai होतोय ट्रेन्ड! ह्युंदाईनं काश्मीरबाबत नेमकं असं काय म्हटलं, की लोकं भडकली?

Lata Mangeshkar Memorial : ‘राजकारण करु नका म्हणता आणि स्वत:च केंद्राकडे बोट दाखवता’, लतादीदींच्या स्मारकावरुन राम कदमांचा राऊतांना टोला

नितेश राणे कोल्हापुरातल्या रुग्णालयात दाखल, नितेश राणेंना झालंय काय?

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.