Pune Crime | धक्कादायक! पुण्यात इमारतीच्या डक्टमध्ये आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह

चिंतामणी हाईट्स सोसायटीतील एका रहिवाशाने दुर्गंधी येत असल्याने खिडकीतून खाली डोकावून पहिले. त्यावेळी त्यांना इमारतीच्या डक्टमध्ये मृतदेह तरंगताना त्यांना आढळून आला.

Pune Crime | धक्कादायक! पुण्यात इमारतीच्या डक्टमध्ये आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह
इचलकरंजीत शाळेत अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने विद्यार्थ्याची आत्महत्याImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 5:14 PM

पुणे – शहरातील खडकवासला धरणात दोन तरुणांनी केलेल्या आत्महत्येची घटना या ताजी असतानाच आज आणखी एक धक्कदायक घटना समोर आली आहे. खडकवासला(Khadakwasla) परिसरातील चिंतामणी हाइटस सोसायटीतील इमारतीच्या डक्टमध्ये अल्पवयीन मुलीचा (minor girl)मृतदेह आढळून आला आहे. मृत मुलगी 16  वर्षाची असून इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेत होती. हीना शब्बीर पठाण असे मृत मुलीचे नाव आहे. मागील 5  दिवसांपासून ती बेपत्ता होती. याबाबत तिच्या आईने पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटना स्थळावर हजर झाले. त्यांनी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाला कळविण्यात आली. नांदेड सिटी  अग्निशमन दलाच्या जवानांनी दोरीच्या मदतीने मुलीचा मृतदेह बाहेर काढला.मी मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने तिची ओळख पटत नव्हती. मात्र चौकशी केल्यानंतर पोलिसांना (Police) ओळख पटवण्यात यश आले

अशी घडली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिंतामणी हाईट्स सोसायटीतील एका रहिवाशाने दुर्गंधी येत असल्याने खिडकीतून खाली डोकावून पहिले. त्यावेळी त्यांना इमारतीच्या डक्टमध्ये मृतदेह तरंगताना त्यांना आढळून आला. त्यांची तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलीस दलातील उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढाेले, हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, सहायक निरीक्षक नितीन नम आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अग्नीशामक दलाला पाचारण करत डक्टमध्ये मृतदेह बाहेर काढला. मात्र मृतदेह सडल्यामुळे त्याची ओलाझ पटवणे अवघड जात होते. याच दरम्यान पोलिसांनी आजूबाजूला चौकशी केली असता त्यांना सोसायटीतील मुलगी गायब असल्याची माहिती मिळाली त्यांनुसार तपास केला असता संबंधित मृतदेह पीडित मुलीचाच असल्याची माहिती समोर आली आहे.

मुलगी पाच दिवसांपासून गायब

मृत हीना 29 मार्च रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आईने पोलिसांकडे दिली होती. मृतदेह हाती वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला . वरून तोला जाऊन पडल्याने जखमी होऊन तिचा मृत्यू झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे. हीनाची सध्या दहावीची परीक्षा सुरू हाेती. हवेली पोलीस तपास करीत आहेत.

मविआचं काम सुरुच, तुम्ही थोडं adjust केलं तर आणखी उत्तम होईल – Ashok Chavan on Devendra Fadnavis

Kalyan Crime : दुसऱ्याला अडकवायला गेला अन् स्वतःच जाळ्यात अडकला, बोगस डॉक्टरला पोलिसांकडून अटक

Gopinath Munde ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या कार्यालयाचे थोड्याचवेळात उद्घाटन

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.