Pune : छतावरच्या 30 फुटी टॉवरवर अडकली होती मांजर, अनोखी शक्कल लढवत अग्निशामक दलानं केली सुटका; पाहा Video
तीस फुटी टॉवरवर (Tower) अडकलेल्या मांजरीला (Cat) अखेर सुखरूप बाहेर काढून तिची सुटका करण्यात आली आहे. अग्निशामक दलाच्या (Fire brigade) जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत त्या मांजरीची सुखरूप सुटका केली आहे.
पुणे : तीस फुटी टॉवरवर (Tower) अडकलेल्या मांजरीला (Cat) अखेर सुखरूप बाहेर काढून तिची सुटका करण्यात आली आहे. शुक्रवार पेठ येथील सुंदर कॉर्नर या तीन मजली इमारतीच्या गच्चीवर तीस फुटी टॉवरवर मांजर अडकली होती. अग्निशामक दलाच्या (Fire brigade) जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत त्या मांजरीची सुखरूप सुटका केली आहे. आज सकाळी आठ वाजता अग्निशामन दलाच्या नियंत्रण कक्षात शुक्रवार पेठ, खडक पोलीस स्टेशनसमोर सुंदर कॉर्नर या तीन मजली इमारतीच्या गच्चीवर एका तीस फूट टॉवरवर मांजर अडकल्याची बातमी अग्निशामक दलाला मिळाली होती. तसेच तिथे समोरच्या इमारतीत राहणारे जवान शफीक सय्यद यांनी ही घटना पाहिली व त्यांनीदेखील याची दखल घेत जवानांशी संपर्क साधला. अनोखी शक्कल लढवत जवानानं मांजरीची सुटका केली.
दोरी आणि बास्केटचा वापर
अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहचताच त्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन शक्कल लढवत दोरी व बास्केटचा वापर करण्याचा निर्णय घेतला. तसेच प्राणी पक्षांच्या बचाव पथकासदेखील संपर्क साधला व लगेचच बचाव कार्य सुरू केले.
Pune : शुक्रवार पेठेतील सुंदर कॉर्नर या 3 मजली इमारतीच्या गच्चीच्या तीन फूट उंच टॉवरवर अडकलेल्या मांजरीची सुखरुप सुटका, अग्निशमन दलाच्या जवानांची कामगिरी #Pune #cat #Video pic.twitter.com/qr2VlG6mXL
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 23, 2022
टॉवरवर जाऊन मांजरीला खाली घेण्याचा प्रयत्न
दलाचे जवान व नुकतेच मा. राष्ट्रपती पुरस्कार विजेते चंद्रकांत आनंदास यांनी दोरी व बास्केट घेत वर टॉवरवर जाऊन मांजरीला खाली घेण्याचा प्रयत्न केला असता मांजर पुढे वर जाऊ लागले. आनंदास यांनी मांजरीला बास्केटमधे घेण्याचा प्रयत्न केला पण तसे घडले नाही तर मांजराला हात लावून पकडत त्या भेदरलेल्या मांजराला आपलेसे करत खांद्यावर घेतले आणि अलगदपणे काळजी करत व धाडसाने त्या मांजरीला घेऊन खाली उतरले व मोहीम फत्ते केली.