Pune Raj Thackeray : ‘राजसभे’ची तारीख अन् वेळ आज ठरणार? सभा जंगी करा, पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंच्या सूचना

पुण्यातील सभेची तारीख मात्र अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र सभा जंगी होणार आतापासूनच कामाला लागण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ठिकाण, तारीख, वेळ लवकरच कळवण्यात येणार आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेची तारीख आणि ठिकाण आज जाहीर होणार आहे.

Pune Raj Thackeray : 'राजसभे'ची तारीख अन् वेळ आज ठरणार? सभा जंगी करा, पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंच्या सूचना
पुणे दौऱ्यादरम्यान राज ठाकरेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 11:05 AM

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची पुण्यातील सभा जंगी होणार आहे. पुणे दौऱ्यावर असताना काल मनसेची बैठक होती. यात त्यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत. कालच्या मनसेच्या शहर कार्यकारीणी बैठकीत पदाधिकाऱ्यांना या सूचना देण्यात आल्या आहेत. सभेला जास्तीत नागरिकांना येण्याचे आवाहन करा, सभेला गर्दी जमवण्यासाठी प्रयत्न करा, असे राज ठाकरे यांनी सांगितले आहे. औरंगाबाद मनसेने (Aurangabad MNS) सभेची जशी तयारी केली होती, तशी तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आगामी अयोध्या दौऱ्याची वातावरणनिर्मिती सध्या मनसेकडून होत आहे. त्यापूर्वी राज ठाकरे पुण्यात (Pune) सभा घेणार आहेत. अयोध्येला जास्तीत जास्त नागरिक, पदाधिकारी येण्यासाठी आवाहन करा, अशी सूचनाही राज ठाकरे यांनी केली आहे.

आज जाहीर होणार सभेची तारीख आणि ठिकाण?

पुण्यातील सभेची तारीख मात्र अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र सभा जंगी होणार आतापासूनच कामाला लागण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ठिकाण, तारीख, वेळ लवकरच कळवण्यात येणार आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेची तारीख आणि ठिकाण आज जाहीर होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः तारीख जाहीर करणार आहेत. मनसेच्या पुण्यातील सभेची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. त्यामुळे औरंगाबादप्रमाणे पुण्यातील सभाही जंगीच होणार असल्याचा कसाय बांधला जात आहे. पुण्यातील या सभेसंबंधी राज ठाकरे स्वतः जाहीर माहिती देणार असल्याचे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी म्हटले आहे. साधारणपणे दुपारपर्यंत मनसेच्या सभेचे ठिकाण जाहीर होणार आहे.

हे सुद्धा वाचा

कार्यकर्त्यांत मात्र राडा

एकीकडे राज ठाकरे शहरातल्या पदाधिकाऱ्यांना सभा जंगी करण्याच्या सूचना करत आहेत. तर दुसरीकडे राज ठाकरे पुण्यातून बाहेर पडताच कार्यकर्ते मात्र एकमेकांमध्ये भिडताना दिसून येत आहेत. काल रात्री शिवाजीनगर येथील मध्यवर्ती कार्यालयात मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. मागील अनेक महिन्यांपासून पुण्यात मनसेची धुसफूस पाहायला मिळत आहे. मात्र राज ठाकरेंकडून त्यावर काही तोडगा निघाला नसल्याचे कालच्या ताज्या राड्यावरून दिसून येत आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी सूचना केल्या असल्या तरी पुण्यातील सभा जंगी होणार का, याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.