Peacock born in the incubator| देशातील पहिलाच यशस्वी प्रयोग ; आता इन्क्युबेटरमध्ये होणार मोराच्या पिल्लांचा जन्म
विविध अडचणीवर मात करत ईला फाउंडेशनने कृत्रिमरित्या अंडी उबवण्याचा इन्क्युबेटर विकसित केला. यामध्ये मोराची अंडी ठेवून आवश्यकत्या वातावरणाची निर्मिती केली. अन तो यशस्वीही करण्यात आला.
पुणे – आतापर्यंत कोंबडीची अंडी इन्क्युबेटरमध्ये कृत्रिमरीत्या उबवून पिलांना जन्म देण्याविषयी आपण ऐकले आहे. तसेच मोराची अंडी कोंबडीच्या अंड्यामध्ये मिसळून नैसर्गिक पद्धतीने उबवल्याचेही आपण पहिले आहे. मात्र भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराची अंडी इन्क्युबेटरमध्ये कृत्रिमरीत्या उबवून पिलांना जन्म देण्याचा प्रयोगही यशस्वी झाला आहे. देशातील हा पहिलाच यशस्वी प्रयोग आहे. या प्रयोगानंतर आता शेतात, वनात कुठेही सापडणारी मोराची अंडी या पद्धतीने कृत्रिमरित्या उबवणे शक्य होणार आहे. पिंगोरी येथे ईला ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये हा प्रयोग करण्यात आला आहे. इनक्युबेटरमध्ये 16 दिवसात ही अंडी उबवली . यामध्ये एकूण चार पिल्ल जन्मली आहेत. या यशस्वी प्रयोगाची माहिती ज्येष्ठ पक्षितज्ञ आणि ईला फाउंडेशनचे संचालक डॉ. सतीश पांडे यांनी दिली आहे.
असा विकसित केला इन्क्युबेटर
अनेकदा रानात , वनात सापडणारी मोराची अंडीही ही भटके श्वान , मुंगूस, कोल्हा, तरस यासारख्या जंगली प्राणी खाऊन टाकतात. तर बऱ्याचदा लांडोरीकडूनही अंडी नैसर्गिक रित्या व्यवस्थित ना उबवल्याने ती वाया जातात. मात्र या नव्याने विकसित झालेलया कृत्रिम इन्क्युबेटर प्रणालीमुळे आता अंडी वाया जाणार नाहीत.
जन्म देण्याचा मार्ग सुकर
मोराच्या अंड्याच्या रक्षण करत त्यातून पिल्लांना जन्म देण्याचा सुकर मार्ग ईला फाउंडेशनने काढला आहे. विविध अडचणीवर मात करत ईला फाउंडेशनने कृत्रिमरित्या अंडी उबवण्याचा इन्क्युबेटर विकसित केला. यामध्ये मोराची अंडी ठेवून आवश्यकत्या वातावरणाची निर्मिती केली. अन तो यशस्वीही करण्यात आला. या प्रयोगामध्ये हुल लोणकर, आविष्कार भुजबळ आणि राजकुमार पवार यांचाही सहभाग होता.
याबाबत बोलताना डॉ. सतीश पांडे म्हणाले की, मोराची अंडी कुठे पडलेली आढळल्यास दया म्हणून काही वेळा लोकांकडून ती अंडी कोंबडीच्या माध्यमातून उबवण्याचा प्रयत्न केला जातो. मोराची अंडी आकाराने मोठी असतात. त्यामुळे ती अंडी कोंबडीकडून योग्य रीतीने उबवली जात नाहीत, कोंबडी ती अंडी अर्धवट सोडून देते आणि ती अंडी वाया जातात. या इन्क्युबेटर आता मोराची अंडी उबवणे सहज शक्य होणार आहे.
Narayan Rane: नारायण राणेंना 8 कमांडोंचं सुरक्ष कवच; केंद्राकडून राणेंना ‘झेड’ दर्जाची सुरक्षा