MHADA exams | ‘पेपर फुटीची शंका आल्याने सायबर पोलिसांना दिली होती कल्पना’… ; शास्त्री रोडवर मोठा पोलीस बंदोबस्त
म्हाडाची परीक्षा रद्द झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्र घेतला. शास्त्री रोड विदयार्थ्यांना आंदोलन करण्यास मज्जाव केला. यावेळी विद्यार्थ्यांना सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तसेच परीक्षांचा सातत्याने होत असलेला गोंधळ लक्षात घेता,सर्व परीक्षा या एमपीएससीच्या मार्फतच घ्याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांनी यावेळी केली.
पुणे – म्हाडा भरतीची परीक्षा रद्द झाल्यानंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळी आहे. परीक्षा रद्द झाल्याची माहिती काळातच पुण्यातील शास्त्री रोडवर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा इशारा देत महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त केला . म्हाडाच्या भरती परीक्षेमध्ये घोळ होण्याची शक्यता विद्यार्थ्यांना वाटत होती. पेपर फुटण्याची शक्यता असल्याने एमपीएसीच्या समन्वयक समितीच्या विद्यार्थ्यांनी पुणे सायबर सेलकडे काही दिवस आधीच तक्रार केली होती. आम्हाला काही माहिती मिळाली होती. त्याबाबतचे काही पुरावेही आम्ही पुणे , औरंगाबाद पोलिसांनाही दिली असल्याची माहितीही विद्यार्थी समितीने दिली आहे.
मोठा पोलीस बंदोबस्त
म्हाडाची परीक्षा रद्द झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्र घेतला. शास्त्री रोड विदयार्थ्यांना आंदोलन करण्यास मज्जाव केला. त्याठिकाणी मोठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अहिल्या अभ्यासिकेच्या बाहेरमोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांना सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तसेच परीक्षांचा सातत्याने होत असलेला गोंधळ लक्षात घेता,सर्व परीक्षा या एमपीएससीच्या मार्फतच घ्याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांनी यावेळी केली.
विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा ..
शासकीय परीक्षाची तयार करणे हे विद्यार्थीसाठी आता शाप ठरत आहे.मागील दोन वर्षापासुन या महाविकास आघाडी सरकारने विद्यार्थीच्या आयुष्याशी अक्षरश; खेळखंडोबा केलाय. सुरवातीला एमपीएससी राज्यसेवाचा पेपर 4 वेळा पुढे ढकला.त्यानंतर टीईटीचा 3 वेळा,आरोग्य विभागाचा 2 वेळा,पोलीस भरतीत सावळा गोंधळ आणी आता म्हाडाचा पेपर पुढे ढकलला. हे चाललंय काय विद्यार्थीना समजणे आकलनाच्या पलीकडे चाललेय. कसल्याही प्रकारची पूर्व कल्पना न देता काही तास ,एक दिवस आधी हे असे मनमानी निर्णय घेताता.विद्यार्थीच्या करीअरची क्षणात राखरांगोळी करतात.यांना अधिकार दिला कोणी?हे अत्यंत खेदजनक व संताप करायला लावणारी बाब आहे.
आरोपी ,दोषी लोक सापडतात,पण या मंडळीना अध्यापही आळा बसला नाही.असे प्रकार सुरुच आहेत.याच्यावर कठोर कारवाई करावी. राज्यात छोटया,छोटया गोष्टीवर लक्ष ठेउन असणारे,विरोधी पक्षासारखी काम करणारी ईडी व सीबीआय याकडे लक्ष का देत नाही? या राजकीय मंडळीचे साटेलोटे आहे काय? इतर राज्याला पुरोगामीची शिकवण देणारे आपले राज्य असा प्रकाराने अधोगतीचे राज्याकडे वाटचाल करत आहे का अशा प्रश्नपडल्याचे मतअध्यक्ष स्टुडंट हेल्पिंग हँड कुलदीप आंबेकर यांनी व्यक्त केला आहे.
Jaipur Rally: हिंदुत्ववाद्यांना सत्तेतून घालवा, हिंदूंची सत्ता आणा; राहुल गांधींची हिंदूंना साद