Pune | पुण्यात प्रंसगवधामुळे आगीचा धोका टाळला ; जाणून घ्या काय घडली घटना
वेळेचे गांभीर्य व आगीचा भडका पाहून अनुभवाच्या जोरावर त्यांनी जेट मशिनच्या पाईपचा आधार घेत धाडसाने भिंतीवर चढून पाण्याचा मारा करत आग शमवली व धोका दूर केला. त्याचवेळी अग्निशमनचे वाहन व महावितरणचे कर्मचारी ही दाखल झाले. अग्निशमन व महावितरणने पुढील कार्य पार पाडले.
पुणे – शहरातील वडारवाडी (Wadarwadi)येथील सावंत चौकात असणाऱ्या इलेक्ट्रिक ट्रॉन्सफॉर्मरने (Electric transformer) अचानक पेट घेतल्याची घटना घडली . मात्र अग्निशमन दलात काम केलेले जवान विनोद सरोदे यांच्या प्रसांगावधानामुळे आग विझवण्यात यश आले.
नेमक काय घडलं वडारवाडी येथील मैनेजमेंट कॉलेज, कैलास हाऊसिंग सोसायटी लगत एका इलेक्ट्रिक ट्रॉन्सफॉर्मरने अचानक पेट घेतला. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत लगेच घटनेची माहिती अग्निशमन दल व महावितरण यांना दिली. कसबा अग्निशमन केंद्र येथून लगेच वाहन रवाना करण्यात आले. त्याचवेळी तेथे कर्तव्य बजावणारे महापालिकेच्या चित्तरंजन वाटिका आरोग्य कोठीचे आरोग्य निरीक्षक विनोद सरोदे तिथे हजार होते.त्यांनी यापूर्वी अग्निशमन दलात काम केलेले केले होते. त्यांनी वेळेचे गांभीर्य व आगीचा भडका पाहून अनुभवाच्या जोरावर त्यांनी जेट मशिनच्या पाईपचा आधार घेत धाडसाने भिंतीवर चढून पाण्याचा मारा करत आग शमवली व धोका दूर केला. त्याचवेळी अग्निशमनचे वाहन व महावितरणचे कर्मचारी ही दाखल झाले. अग्निशमन व महावितरणने पुढील कार्य पार पाडले.
विनोद सरोदे यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे त्यांचे नागरिक व इतर जवानांनी कौतुक केले. कसबा अग्निशमन केंद्र येथील चालक संदीप थोरात, संतोष अरगडे, गणेश लोणारे, सुरेश पवार यांनी सहभाग घेतला.
धोका पत्करत कसं काढलं शेळीच्या पिल्लाला खड्ड्यातून बाहेर? Video Viral