पुण्यात शालाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या वाढली, जिल्ह्यात बालमजुरी वाढण्याचा धोका!

ग्रामीण भागासह शहरातही आर्थिक स्थिती साधारण असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित रहावं लागतं आहे. या काळात शाळाबाह्य विद्यार्थ्यांची (Out of School Students) संख्याही वाढल्याचं चित्र आहे. त्यामुळे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून तुटलेली ही मुलं बालमजुरीच्या वाटेवर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पुण्यात शालाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या वाढली, जिल्ह्यात बालमजुरी वाढण्याचा धोका!
Follow us
| Updated on: Aug 23, 2021 | 4:39 PM

पुणे : गेल्यावर्षापासून कोरोनाच्या (Corona) प्रादुर्भावामुळे राज्यातल्या शाळा (Schools) बंद आहेत. विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाईन शिक्षण (Online Education) दिलं जात असतं तरी त्याच्या मर्यादा आता स्पष्ट झाल्या आहेत. ग्रामीण भागासह शहरातही आर्थिक स्थिती साधारण असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित रहावं लागतं आहे. या काळात शाळाबाह्य विद्यार्थ्यांची (Out of School Students) संख्याही वाढल्याचं चित्र आहे. त्यामुळे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून तुटलेली ही मुलं बालमजुरीच्या वाटेवर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (The lockdown has led to an increase in the number of out-of-school students in Pune and child labour is likely to increase)

शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान

गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे शाळा बंद असल्याने कित्येक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं आहे. त्यात लॉकडाऊनमुळे कित्येक कुटुंबांचं आर्थिक गणित बिघडलं. त्यामुळे मुलांना मजुरासाठी किंवा कामासाठी पाठवलं जाण्याची शक्यता वाढली असल्याचं अनेक शिक्षक आणि मुख्याध्यापकांचं म्हणणं आहे.

रोजंदारीवर जाणाऱ्या मुलांची संख्या वाढू शकते

शाळा बंद झाल्यापासून अनेक शिक्षकांना विद्यार्थी कामावार जात असल्याचं आढळून आलं आहे. शाळा आणखी काही महिने बंद राहिल्यास शाळा सोडून रोजंदारीवर जाणाऱ्या मुलांची संख्या वाढू शकते, अशी शक्यता निर्माण झाली आहे. शाळा सुरू असताना पोषण आहार सुरू असतो. त्यासाठीही अनेक विद्यार्थी शाळेत येत असतात. त्यानिमित्ताने मुलांना शाळा आणि शिक्षणाची गोडी लागते. मात्र, आता शाळा आणि पोषण आहार बंद असल्याने दोन वेळच्या जेवणासाठी मुलं रोजंदारीवर जाण्याचा पर्याय निवडत असल्याचं दिसत आहे.

मुलं व्यसनांच्या आहारी जाण्याची भीती

आणखी काही महिन्यांनी शाळा सुरू झाली तरी ही मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात परत येतील का असाही सवाल उपस्थित होतो आहे. कारण, तोपर्यंत घरच्यांचा दबाव आणि पैसा यामुळे काम सोडून ही मुलं शाळेत बसण्याबाबत शंका आहे. त्यात कमी वयात पैसे हातात आल्याने मुलं व्यसनांच्या आहारी जाण्याची भीतीही शिक्षक व्यक्त करत आहेत. याकाळात चुकीची सोबत मिळाली तर ही शाळाबाह्य मुलं गुन्हेगारीकडे वळण्याचीही शक्यता आहे. अशी अनेक उदाहरण दिसल्याचंही शिक्षकांनी सांगितलं. त्यामुळे सरकारने शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा असं शिक्षक आणि मुख्याध्यापक संघटनांचं म्हणणं आहे.

संबंधित बातम्या :

सीबीएसई, आयसीएसई शाळांमध्ये मराठी शिकवली का? शाळांना अहवाल सादर करण्याचे आदेश!

अकरावीच्या पहिल्या प्रवेश फेरीची मुदत संपली, आता 27 ऑगस्टला मेरिट लिस्ट लागणार

पुण्यात ‘डॉ. सायरस पूनावाला स्किल डेव्हलपमेंट सेंटर’ची स्थापना, कौशल्यविकास कोर्सेसचं प्रशिक्षण, असा घ्या प्रवेश

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.