‘ही’ पोटनिवडणूक का ठरते आहे लक्षवेधी”; भाजपच्या राजकीय संस्कृतीवरच प्रश्नचिन्ह…
भाजपबाबत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार हल्लाबोल करत त्यांनी भाजपला वाटत आहे की, ही निवडणूक बिनविरोध व्हावी परंतु याच भाजपने पंढरपूरमध्ये उमेदवार दिला होता मग त्यावेळी भाजपची राजकीय संस्कृती कुठे गेली होती
पुणेः आमदार मुक्ताताई टिळक यांचे निधन झाल्यानंतर कसबा विधानसभेची पोटनिवडणूक ही बिनविरोध होणार असच चित्र निर्माण झाले होते. मात्र आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ही पोटनिवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या निवडणुकीकडे साऱ्या राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी ही कसबा विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही असं आता स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक झाली तर राजकीय चित्र नेमकं काय होणार याकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी या निवडणुकीविषयी बोलताना सांगितले की, आम्ही शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्याकडे विनंती करणार आहोत की, ही निवडणूक आपण लढली पाहिजे असं सांगणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी या पोटनिवडणुकीविषयी यांनी स्पष्टच सांगितले आहे की, पक्षाने जर आदेश दिला तर मी नक्की कसबा विधानसभा पोट निवडणूक लढणारच आहे. त्यामुळे या निवडणुकीत नेमकी उमेदवारीला कोणाला मिळणार याकडेही साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
भाजपबाबत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार हल्लाबोल करत त्यांनी भाजपला वाटत आहे की, ही निवडणूक बिनविरोध व्हावी परंतु याच भाजपने पंढरपूरमध्ये उमेदवार दिला होता मग त्यावेळी भाजपची राजकीय संस्कृती कुठे गेली होती असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.