Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्याच्या ग्रामीण भागात वाढला कोरोना, कमी झालेल्या हॉटस्पॉट गावांची संख्या पुन्हा शंभरीपार!

पुणे (Pune) जिल्ह्याच्या ग्रामीण (Pune Rural) भागात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढल्याचं दिसत आहे. गेले दोन आठवडे आटोक्यात असलेल्या कोरोनाने या आठवड्यात पु्न्हा डोकं वर काढलं आहे. गेल्या आठवड्यात कमी झालेल्या हॉटस्पॉट (Hotspot) गावांची संख्या पुन्हा वाढली आहे.

पुण्याच्या ग्रामीण भागात वाढला कोरोना, कमी झालेल्या हॉटस्पॉट गावांची संख्या पुन्हा शंभरीपार!
कोरोना
Follow us
| Updated on: Aug 31, 2021 | 3:04 PM

पुणे : पुणे (Pune) जिल्ह्याच्या ग्रामीण (Pune Rural) भागात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढल्याचं दिसत आहे. गेले दोन आठवडे आटोक्यात असलेल्या कोरोनाने या आठवड्यात पु्न्हा डोकं वर काढलं आहे. गेल्या आठवड्यात कमी झालेल्या हॉटस्पॉट (Hotspot) गावांची संख्या पुन्हा वाढली आहे. पुणे जिल्ह्यातल्या गेल्या आठवड्यात 95 गावं हॉटस्पॉट होती, त्यांची संख्या आता पुन्हा वाढून 103 वर गेली आहे. सध्या पुणे ग्रामीणमध्ये 3.6 टक्के बाधित दर आहे. (The number of corona hotspot villages in Pune district has increased once again)

धडक सर्वेक्षण मोहीमेमुळे कोरोना दर आटोक्यात

पुणे आरोग्य प्रशासनाने धडक सर्वेक्षण मोहीम हाती घेतली होती. या मोहीमेचा ग्रामीण भागातला कोरोना दर आटोक्यात आणण्यात मोठी मदत झाली. त्यानंतर जिल्ह्याचा कोरोनाबाधित दर पाच टक्क्यांच्या आली आल्यामुळे पुणे (Pune), पिंपरी चिंचवडसह (Pimpri Chinchwad) ग्रामीण भागात निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.

हॉटस्पॉट गावांची संख्या 95 वरून पुन्हा 103

ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला 100 गावांमध्ये 10 पेक्षा जास्त कोरोनारुग्णांची संख्या होती. त्यानंतर यामध्ये घट होऊन 95 गावं हॉटस्पॉट राहिली. मात्र, आता जिल्ह्यातल्या हॉटस्पॉट गावांची संख्या पुन्हा शंभरीपार गेली आहे. सध्या जिल्ह्यात 103 गावांमध्ये 10 पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यामुळे अशा गावांमध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजना आणि लसीकरण वाढवण्यावर भर देण्यात आला आहे.

गेले दोन आठवडे पुण्याच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत होती. त्यामुळे हॉटस्पॉट गावांची संख्या 95 वर आली होती.  पण या आठवड्यात कोरोनाचा दर जरी आटोक्यात असला तरी रुग्णसंख्या वाढल्याने हॉटस्पॉट गावांची संख्या वाढली आहे. या आठवड्यात हॉटस्पट या हॉटस्पॉट गावांमध्ये दहापेक्षा जास्त कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. काही औद्योगिक वसाहती असलेल्या भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याचं आव्हान आरोग्य विभागापुढे आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने हॉटस्पॉट गावांसह सर्वच ठिकाणी धडक चाचण्यांची मोहीम हाती घेतली होती. या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

ग्रामीण भागात लसीकरणाला वेग

पुण्याच्या ग्रामीण भागात लसींचा पुरवठा मुबलक प्रमाणात होऊ लागल्याने लसीकरणाने (Corona Vaccination) वेग पकडला आहे. आतापर्यंत 27 लाख 14 हजार 944 जणांचे लसीकरण झालं आहे. त्यापैकी अडीच लाख नागरिकांना मागच्या 15 दिवसांत लस देण्यात आली आहे. आतापर्यंतच्या लसीकरणात 18 लाख 94 हजार 469 नागरिकांना पहिला तर 8 लाख 20 हजार 457 नागरिकांना कोरोना लसींचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

चाचण्यांचं प्रमाण वाढवलं, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन

सर्व तालुक्यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर दिल्याने कोरोनाबाधितांचा दर कमी झाला असल्याचं जिल्हा परिषदेने सांगितलं आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा दर कमी होत असला तरी चाचण्यांचं प्रमाण वाढवण्यात आलं आहे. अजूनही कोरोना पूर्णपणे गेला नसल्याने नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

बारामती, शिरूर, इंदापूर आणि जुन्नर या तालुक्यांमध्ये इतर तालुक्यांच्या तुलनेत कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत.

इतर बातम्या :

‘सरकार कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोना विरोधात’, आरोग्य उत्सव साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन

मुख्यमंत्र्यांसमोर प्रताप सरनाईक म्हणाले, मी सर्वांना ऑक्सिजन देतो, पण मला आणि इतरांना संजय राऊत ऑक्सिजन देतात!

आता धावणार इलेक्ट्रिक एसटी, पुण्यातून या पाच शहरांचा प्रवास होणार सुखकर

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.