Omicron alert| पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने २ हजारांचा टप्पा ओलांडला
ओमिक्रॉनचा वाढत धोका लक्षात घेत जिल्हा प्रशासनाबरोबरच महानगरपालिका ही वेगवान लसीकरण मोहीम राबवत आहे. शहरात सद्यस्थितीला 185 लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरु आहे. याबरोबरच शहरातील आरोग्य यंत्रणाही सर्तक असून वाढत धोका लक्षात घेत रुग्णालये सज्ज ठेवण्यात आली आहेत.
पुणे – देशासह राज्यात ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्या वाढत आहेत. दुसरीकडं ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येबरोबरच कोरोनाची रुग्णसंख्याही वाढ आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येनं पुन्हा दोन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यात तब्बल २ हजार ५३ रुग्ण आहेत. यापैकी शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयात कोरोनाबाधितवर उपचार सुरु आहे.
शहरातील कोरोना स्थिती शहरात काल (मंगळवार) 171 कोरोनाबाधित आढळून आले. असून, 91 जण कोरोनामुक्त झाले आहेत़ पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे आज एकजणाचा मृत्यू झाला आहे़ सध्या विविध रुग्णालयांत सध्या 85 गंभीर रुग्णांवर तर 57 रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत़ शहरात आतापर्यंत 38 लाख 45 हजार 409 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यांतील 5 लाख 9 हजार 276 जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यांपैकी 4 लाख 99 हजार92 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत शहरात 9 हजार 115 जणांचा मृत्यू झाला आहे.
लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर
ओमिक्रॉनचा वाढत धोका लक्षात घेत जिल्हा प्रशासनाबरोबरच महानगरपालिका ही वेगवान लसीकरण मोहीम राबवत आहे. शहरात सद्यस्थितीला 185 लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरु आहे. याबरोबरच शहरातील आरोग्य यंत्रणाही सर्तक असून वाढत धोका लक्षात घेत रुग्णालये सज्ज ठेवण्यात आली आहेत. मागील काही दिवसांपूर्वीच शहरातील चारशे बेडचे जम्बो कोविड रुग्णालयही सुज्ज करून ठेवण्यात आले आहे.
कोरोना नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेत शहारातील कोरोनाचे निर्बंध कडक करण्यात आले आहेत. मास्कचा वापर करणे , सोशल डिस्टन्सचे पालन करणे यासारख्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे.
sugar cane : परिश्रमाला जोड नियोजनाची, सरकारने नाही पण शेतकऱ्याने करुन दाखवले दुप्पट उत्पन्न