Pune : रस्त्याच्या कडेला असलेलं अर्धवट जळालेलं झाड अंगावर पडलं; पुण्याच्या सासवडमध्ये जोडप्यासह सात वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

रस्त्याच्या कडेला असणारे वडाचे झाड अंगावर पडल्याने, दुचाकीवरील जोडप्याचा आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सात वर्षाच्या एका लहान मुलीचा मृत्यू (Dead) झाला आहे. पुरंदर तालुक्यातील वीर सासवड मार्गांवर ही दुर्दैवी घटना घडली.

Pune : रस्त्याच्या कडेला असलेलं अर्धवट जळालेलं झाड अंगावर पडलं; पुण्याच्या सासवडमध्ये जोडप्यासह सात वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू
याच दुचाकीवरून जात होते जाधव दाम्पत्यImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 11:53 AM

पुणे : रस्त्याच्या कडेला असणारे वडाचे झाड अंगावर पडल्याने, दुचाकीवरील जोडप्याचा आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सात वर्षाच्या एका लहान मुलीचा मृत्यू (Dead) झाला आहे. पुरंदर तालुक्यातील वीर सासवड मार्गांवर ही दुर्दैवी घटना घडली. रेणुकेश जाधव आणि त्यांची पत्नी सारिका जाधव असे मृत्यूमुखी पडलेल्या जोडप्याचे नाव आहे. तर त्यांची 7 वर्षाची भाची ईश्वरी हिचासुद्धा यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रेणुकेश आणि सारिका यांचा 4 महिन्यांपूर्वीच विवाह (Wedding) झाला होता, या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. रेणुकेश आणि सारिका हे दोघेही 7 वर्षाच्या भाचीसह, सासवडवरून (Saswad) वीरच्या दिशेने परिंचे या गावी दुचाकीवरून जात होते. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास वादळासह पावसाला सुरुवात झाली. यावेळी त्यांना समोरचे व्यवस्थित दिसतही नव्हते.

jadhav

रेणुकेश जाधव आणि सारिका जाधव

जागीच मृत्यू

पावसादरम्यान पिंपळे गावाच्या हद्दीत रस्त्याशेजारी असणारे अर्धवट झळालेले वडाचे झाड रेणुकेश यांच्या दुचाकीवर पडले. यात रेणुकेश आणि सारिका यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची सात वर्षाची भाची ईश्वरी ही गंभीर जखमी झाली होती, तिला पुढील उपचारासाठी पुण्यात हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

आणखी वाचा :

Supriya Sule : किती हल्ले झाले, मात्र मुख्यमंत्र्यांनी शब्दही काढला नाही, त्यांच्या सुसंस्कृतपणाचा अभिमान; सुप्रिया सुळेंकडून कौतुक

CCTV : लेडिज वेअरमधून हजारोंच्या मालावर चोरट्यानं केला हात साफ; पुण्याच्या तळेगाव दाभाडेतली चोरी सीसीटीव्हीत कैद

Pune Rain: बिन मौसम बरसात! पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार! अनेक ठिकाणी बत्ती गुल, पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत कुठे कुठे हजेरी? वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.