Kukadi River Pollution | कुकडी नदीतील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर ; जलपर्णी ठरतेय डोकेदुखी
कुकडी नदीत उद्योग धंद्यामधून बाहेर पडणारे रसायन मिश्रित पाणी, मैला, प्लास्टिक कचरा देखील नदीपात्रात टाकला जातो. नदीच्या पात्रात जलपर्णीची वाढ मोठ्याप्रमाणात झाली आहे. साहजिकच घाणीचे साम्राज्य वाढले आहे.त्यामुळे साथीचा प्रादुर्भाव होऊ शकतो.व नागरीकाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते अशी स्थिती निर्माण झाली आहे.
पुणे – जुन्नर तालुक्यातील कुकडी नदीतील प्रदूषित पाण्याचा प्रश्न दिवसोदिवस गंभीर होत चालला आहे. या नदीकाठच्या सर्व गावांमधील सांडपाण्याचा विसर्ग कोणत्याही प्रकारची शुध्दीकरण प्रकिय न होता थेट नदीपात्रात होत असल्याने प्रदुषण वाढीस लागले आहे. यासगळ्याच्या मोठा फटका धरणा लगतच्या गावांना बसत आहे. यामध्ये प्रामुख्याने जुन्नर, गोळेगाव,अमरापुर,कुमशेत,हापुसबाग,शिरोलीखुर्द , तेजोवाडी तसेच लगतच्या गावांचा समावेश आहे.
नागरिकांच्या आरोग्याला धोका
कुकडी नदीत उद्योग धंद्यामधून बाहेर पडणारे रसायन मिश्रित पाणी, मैला, प्लास्टिक कचरा देखील नदीपात्रात टाकला जातो. नदीच्या पात्रात जलपर्णीची वाढ मोठ्याप्रमाणात झाली आहे. साहजिकच घाणीचे साम्राज्य वाढले आहे.त्यामुळे साथीचा प्रादुर्भाव होऊ शकतो.व नागरीकाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते अशी स्थिती निर्माण झाली आहे.
सात तालुक्यातील शेतीसाठी होतोय पाण्याचा वापर कुकडी प्रकल्पाअंतर्गत 80 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. रब्बी हंगामाच्या सिचंनासाठी कालव्याद्वारे 8.775 टि.एमसी वापराचे नियोजन असून कुकडी प्रकल्पाअंतर्गत आज अखेर 23.669 टिएमसी (79.73टक्के )उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. प्रकल्पाअंतर्गत धरणातुन रब्बी पिकाच्या सिचंनासाठी कालव्याद्वारे 8.775 टीएमसी पाणी वापर करण्याचे नियोजन केले आहे. या पाण्याचा लाभ पुणे , नगर,व सोलापूर जिल्ह्य़ातील जुन्नर, आंबेगाव,शिरूर, पारनेर, कर्जत ,करमाळा या सात तालुक्यातील 1 लाख 40 हजार हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकाच्या सिंचनासाठी होणार आहे.
धरण निहाय शिल्लक पाणीसाठा…
येडगाव धरण – 1.794 टिएमसी- 92.33 टक्के माणिकडोह – 65.77 टिएमसी – 6.697 टक्के वडज- 96.22टिएमसी – 1.129 टक्के डिभे- 11 टि.एम सी – 89.68 टक्के पिपंळगाव जोगे- 72 टिएमसी – 2.837 टक्के
ख्रिसमसची लगबग, टीव्ही9 कडून ख्रिसमसचं खास गिफ्ट, घरच्या घरी बनवा खास ड्रायफ्रूट केक
Omicron : मराठवाडा, विदर्भात ओमिक्रॉनचा फैलाव वाढला, उस्मानाबाद, बुलडाण्यात नवे रुग्ण
Bullock cart race| बैलगाडा शर्यतीबाबत उद्या सकारात्मक निकाल लागेल अशी आशा- आमदार महेश लांडगे