पिंपरी चिंचवड : सर्व सामान्य नागरिकांकडून खंडणी (Ransom) उकळणाऱ्या एका आरोपीला (Accused) चक्क पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Commissioner of Police Krishna Prakash) वेषांतर करून जेरबंद केले आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि मुंबई पोलीस दलातील विश्वास नांगरे पाटील यांचा विश्वासू असल्याचे सांगून तो नागरिकांना खंडणी मागत होता. नेहमीच चर्चेत असणारे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्धी आणि पत्रकार परिषदापासून लांब होते. परंतु, एका ऑडिओ क्लिपवरून खंडणी मागणाऱ्या आरोपीला वेषांतर करून पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश बेड्या ठोकल्या. त्यामुळे पुन्हा एकदा पोलीस आयुक्तांची चर्चा रंगली आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे प्रसिद्धीसाठी आटापिटा करत आहेत का, असा प्रश्न विचारला जात आहे.
याआधीही अनेकदा केलं होतं वेशांतर
याआधीही आयपीएस कृष्णप्रकार हे मुस्लिम लूक बनवून, दाढी लाऊन एका पोलीस ठाण्यात पोहोचले होते. त्यांच्या त्या वेशांतराचीही चर्चा झाली होती. वेगवगळ्याकारणाने आयपीएस कृष्णप्रकाश हे नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा त्यांनी वेशांतर केल्याने पुन्हा जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस अनेकदा वेशांतर करत असतात. कधी कधी भेळ विकणारा, भजी विकणाराही होतात. मात्र आयुक्त पातळीवरच्या एका अधिकाऱ्याने असे वेशांतर केल्याने त्याची जास्त चर्चा आहे.
खंडणी मागणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी पोलीस आयुक्तांना स्वतः कारवाई करावी लागत आहे, हे पिंपरी पोलिसांचे अपयश तर नाही ना, अशीही चर्चा रंगत असल्याचे दिसत आहे. पाहा व्हिडिओ –