Pune Corona alert | ओमिक्रॉनच्या धोका वाढतोय ; पुणे शहरातील कोरोनाच्या रुग्णवाढीचा वेग दुप्पट
ओमिक्रॉनच्या विषाणूचा फैलाव खूप वेगाने होत आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मकी वर्तनामध्ये शैथिल्य आणणे धोकादायक आहे. कोरोनाचा संसर्ग सुरुवातीच्या काळात लक्षण विरहित होता. त्याचप्रमाणे ओमिक्रॉनसुद्धा सद्यस्थितीला लक्षण विरहीत दिसत आहे. त्यामुळे अधिक धोका निर्माण होवू शकतो.
पुणे- शहरातील ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्ण संख्येबरोबरच कोरोनाच्या रुग्णाच्या संख्याही दुपटीने वाढत आहे. जिल्ह्यात बुधवारी नवीन 404 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिवाळीनंतर वेगाने वाढत असलेली कोरोना रुग्ण संख्या प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. पुणे जिल्ह्यात सद्यस्थितीला कोरोना 11 लाख 63 हजार 426इतकी झाली आहे. दुसरीकडं राज्यात काल (बुधावारी) 85 रुग्णांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील 9 जणांचा समावेश आहे. पुणे शहरातील 2, पिंपरीचिंचवडमधील सहा तर पुणे ग्रामीणमध्ये एक रुग्ण आहे.
संसर्ग रोखण्यासाठी उपाय हवेत
ओमिक्रॉनच्या विषाणूचा फैलाव खूप वेगाने होत आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मकी वर्तनामध्ये शैथिल्य आणणे धोकादायक आहे. कोरोनाचा संसर्ग सुरुवातीच्या काळात लक्षण विरहित होता. त्याचप्रमाणे ओमिक्रॉनसुद्धा सद्यस्थितीला लक्षण विरहीत दिसत आहे. त्यामुळे अधिक धोका निर्माण होवू शकतो. ज्या नागरिकांनी लास घेतली नाहीत त्यांनी तात्काळ लसीच्या दोन्ही मात्र घेणे गरजेचे आहे. इतकंच नव्हेत तर कोरोनाच्या कटाक्षाने चाचण्या करणे आवश्यक आहे. असे मत डॉकटर अविनाश भोंडवे यांनी केले आहे.
ओमिक्रॉनचा समूह संसर्ग सुरु झाल्याचा अंदाज
राज्यात अचानक कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याने भीती निर्माण झाली आहे. पुण्यातील आयसर संस्थेने घेतलेल्या 38 नमुन्यांच्या चाचण्यामधून मुंबई पुण्यात ओमायक्रोन समूह संसर्ग सुरु झाल्याचे प्राथमिक निदान झाले आहे. राज्यात ओमायक्रोनचा प्रसार वेगाने होत असला तरी रुग्णांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज नसल्याचं निरीक्षण यामध्ये नोंदवण्यात आले आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण का वाढत आहे ते शोधण्यासाठी काही रुग्णांचे नमुने आयसर प्रयोगशाळेत तपासणीसाठी दिले होते
आजपर्यंत राज्यात एकूण 252 ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण
आजपर्यंत राज्यात एकूण 252 ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पिंपरी चिंचवडमधील 25, पुणे ग्रामीणमधील 18 आणि पुणे शहरातील 11 रुग्णांचा समावेश आहे. यापैकी ९९ रुग्णांना आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत 879 प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 176 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
३ जानेवारी पासून 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणास सुरवात
पिंपरी चिंचवड महापालिकेकडून 15 ते 18 वयोगटातील मुलांना येत्या 3 जानेवारी पासून कोरोना विरोधी लस देण्यास सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झालंय. लसीकरणासाठी 1 जानेवारीपासून ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे तर 3 जानेवारी पासून लसीकरण केंद्रांवर ही नोंदणी करता येणार आहे. -15 ते 18 वयोगटातील लसीकरण पात्र लाभार्थी अंदाजे संख्या 1 लाख 16 हजार 700 एवढी आहे. जास्तीत जास्त लाभार्थीनी लसीकरणाचा लाभ घ्यावा अस आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
Corona | नियम कडक, पण पाळतंय कोण? APMCमध्ये नियमांची पायमल्ली, मार्केट बंद करावं लागणार?
नसिरुद्दीन शाह म्हणाले, आम्ही 20 कोटी, घाबरणार नाही, भिडू, लढू, मोघलांबाबतही वादग्रस्त बोलले?
ओमायक्रॉनने बँकांना धडकी, कर्ज वसुलीला ब्रेक लागण्याची शक्यता, बँक NPA 9 टक्क्यांवर जाण्याचा अंदाज