आरटीओ म्हणतं, पीयूसीची दरवाढ होणार नाही, तर संघटना दरवाढीवर ठाम! पुणेकर संभ्रमात
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात (Pune) पीयूसीचे (PUC) दर वाढणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्या चर्चांना वाहतूक विभागाने पूर्णविराम दिला आहे. तूर्तास तरी पुण्यातले पीयूसीचे दर वाढणार नसल्याचं वाहतूक विभागानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पुणेकरांना बसणारा जास्तीचा भूर्दंड टळणार आहे.
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात (Pune) पीयूसीचे (PUC) दर वाढणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्या चर्चांना वाहतूक विभागाने पूर्णविराम दिला आहे. तूर्तास तरी पुण्यातले पीयूसीचे दर वाढणार नसल्याचं वाहतूक विभागानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पुणेकरांना बसणारा जास्तीचा भूर्दंड टळणार आहे. असं असलं तरी दुसरीकडे दरवाढ करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं पीयूसी सेंटर असोसिएशनने (PUC Centre Association) म्हटलं आहे. त्यामुळे पीयूसीची दरवाढ होते की प्रस्ताव गुंडाळला जातो ते पुढच्या महिन्यात स्पष्ट होणार आहे. (The RTO has clarified that PUC rates will not be increased)
… तर संबंधितांवर कडक कारवाई
येत्या 16 तारखेपासून पीयूसीची दरवाढ होार असल्यानं वाहनचालक चिंतेत होते. मात्र, सध्या पीयूसीसाठी कोणत्याही प्रकारची दरवाढ होणार नसल्याचं आरटीओ प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. एखाद्या पीयूसी केंद्रावर निर्धारित दरापेक्षा वाढीव दराने पीयूसी केली जात असेल तर त्यासंदर्भात तक्रार करावी, संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल असंही आरटीओ प्रशासनाने म्हटलं आहे.
पीयूसी संघटना दरवाढीवर ठाम
पीयूसी म्हणजेच पोल्यूशन अंडर कंट्रोल सर्टिफिकीटमध्ये 2011 पासून दरवाढ करण्यात आलेली नाही. यासंदर्भात पीयूसी संघटनांनी राज्य सरकारकडे वारंवार विनंती आणि निवेदने दिली आहेत. मात्र तरीही त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे ऑनलाईन पीयूसीमुळे खर्च वाढला असल्याचं पीयूसी संघटनेचं म्हणणं आहे. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर ही शहरं वगळता इतर शहरांमध्ये पीयूसीचा व्यवसाय होत नाही. त्यामुळे आता कारवाई झाली तरी 16 तारखेपासून दर वाढवणारच असा इशारा संघटनेनं दिला आहे.
ऑनलाईनमुळे खर्च वाढला
2019 पासून पीयूसीचे सर्व सेंटर्स हे ऑनलाईन करण्यात आले आहेत. त्यासाठी मशिनमध्ये मोठ्या प्रमाणावर बदला करावा लागला आहे. 2019 मध्ये शासकीय दरवाढ देण्यासाठी परिपत्रक काढण्यात आलं होतं. मात्र, 2 वर्षे उलटून गेले तरी त्यावर काही अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आता मागे हटणार नाही असं पीयूसी संघटनेचं मत आहे.
वाहनचालकांचा दरवाढीला विरोध
एकीकडे पीयूसी संघटना दरवाढीसाठी आक्रमक झाल्या आहेत तर दुसरीकडे वाहनचालकांनी मात्र, दरवाढीला विरोध दर्शवला आहे. आधीच कोरोनाकाळात सर्वांची आर्थिक गणितं बिघडली आहेत. त्यात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरानं महिन्याचं बजेच कोलमडलं आहे. त्यात पीयूसीचा वाढलेला दर परवडणारा नाही असं वाहनचालकांचं म्हणणं आहे. अनेक वाहतूक संघटनाही पीयूसीची दरवाढ होऊ नये अशी मागणी करत आहेत.
हेही वाचा :