दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या दोघांना कोरोनाची लागण, संपर्कात आल्याने पिंपरी-चिंचवडमधील एक जण पॉझिटिव्ह

या तिघांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे का हे तपासण्यासाठी त्यांच्या घशातील स्वॅब नमुने जिनोम सिकव्हेंसिंगकरीता पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहेत. याचा अहवाल आल्यानंतर ओमिक्रॉनची लागण आहे का ते स्पष्ट होईल.

दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या दोघांना कोरोनाची लागण, संपर्कात आल्याने पिंपरी-चिंचवडमधील एक जण पॉझिटिव्ह
कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्डचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही ओमिक्रॉनची लागण
Follow us
| Updated on: Dec 01, 2021 | 7:53 PM

पिंपरी चिंचवड : दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये आलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या दोघांच्या संपर्कात आलेल्या पिंपरी-चिंचवडमधील अन्य एक जणही कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे. या तिघांवरही पिंपरी कॅम्पमधील नवीन जिजामाता रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिघांचीही प्रकृती आता स्थिर असून त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना होम क्वारन्टाईन करण्यात आले आहे, असे महापालिकेचे सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

तिघांची प्रकृती स्थिर

दक्षिण आफ्रिकेतील नायजेरियातून दोन जण गुरुवारी पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. या दोघांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचमीचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर या दोघांच्या संपर्कात आलेल्या एका व्यक्तीचा मंगळवारी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या तिघांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे का हे तपासण्यासाठी त्यांच्या घशातील स्वॅब नमुने जिनोम सिकव्हेंसिंगकरीता पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहेत. याचा अहवाल आल्यानंतर ओमिक्रॉनची लागण आहे का ते स्पष्ट होईल.

नायजेरियात अद्याप ओमिक्रॉनचा शिरकाव नाही

आफ्रिका व युरोपीय देशांमध्ये सध्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन विषाणूचा हाहाःकार सुरु आहे. मात्र असे असले तरी नायजेरिया या देशामध्ये तो विषाणू अद्याप आढळून आलेला नाही, असे डॉ. गोफणे यांनी स्पष्ट केले आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश प्रशासनाने दिले असून त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरात परदेशातून आलेल्यांची तत्काळ तपासणी करण्यात येत आहे. (The two, who came to Pimpri Chinchwad from South Africa, contracted corona)

इतर बातम्या

‘शेतकऱ्यांना वीज बिल भरावं लागेल, फार तर सवलत मिळेल, भाजपनं सवय लावून ठेवली’, ऊर्जामंत्र्यांचा भाजपवर निशाणा

VIDEO : वॉशरुमला जाण्यासाठी महिलांकडून पत्र लिहून घ्यायचा, पुण्यात मॅनेजरला मनसे स्टाईलने दणका

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.