पर्यटकांचे आकर्षण असलेल्या भुशी डॅम सांडव्यावरुन वाहणारे पाणी ओसरले, हौशी पर्यटकांचा हिरमोड
गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली असून त्याचा परिणाम प्रसिद्ध भुशी धरणाच्या सांडव्यावरून वाहणारे पाणी ओसरलं आहे. (the water flowing from the drain of Bhushi dam receded tourists disappointed)
पुणे : लोणावळ्यातील भुशी डॅम (Bhushi Dam) म्हणजे राज्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू… पावसाळ्यात इथे तुडुंब गर्दी होते… लोणावळ्याच्या वेशीवर हाऊसफुल्लची पाटी लावावी की काय, एवढी गर्दी… परंतु सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. तरीही काही हौशी पर्यटक इथे येतातच. मात्र यावेळी आतापर्यंत कमी पाऊस झाल्याने पर्यटकांचे आकर्षण असलेल्या भुशी धरणाच्या सांडव्यावरून वाहणारे पाणी ओसरल्याचं चित्र आहे. (The water flowing from the drain of Bhushi dam receded tourists disappointed)
भुशी धरणाच्या सांडव्यावरून वाहणारने पाणी ओसरलं
गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली असून त्याचा परिणाम प्रसिद्ध भुशी धरणाच्या सांडव्यावरून वाहणारे पाणी ओसरलं आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोणावळ्यात पर्यटक याच भुशी धरणाचा आनंद घेण्यासाठी येतात मात्र कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पर्यटनासाठी बंदी असतानादेखील हौशी नागरिकांचे पाय पर्यटन नगरीकडे वळतातच…
पर्यटकांचे आकर्षण असलेल्या भुशी डॅमच्या सांडव्यावरून वाहणारे पाणी ओसरले, हौशी पर्यटकांचा हिरमोड@TV9Marathi pic.twitter.com/M7Dfo6vOaZ
— Akshay Adhav (@Adhav_Akshay1) July 6, 2021
तर तो नजारा काही और…
इतक्या कमी प्रमाणाच्या पाण्यातही आनंद घेण्याचा प्रयत्न काही पर्यटक करतानाचं चित्र सध्या दिसून येत आहे. मात्र नेहमीसारखा पाऊस झाला असता आणि सांडव्यावरून दरवर्षीप्रमाणे पाणी वाहिलं असतं तर तो नजारा काही और असतो, अशी खंत पर्यटक व्यक्त करत आहेत.
लोणावळ्यात पर्यटकांना ‘नो एन्ट्री’
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेले अनेक दिवस महाराष्ट्रात कडक निर्बंध लावले गेले आहेत. त्यानुसार राज्यातील जास्त कोरोना रुग्ण असलेली शहरं, धार्मिक स्थळं, तसंच पर्यटन स्थळांवर कडक निर्बंध लावले आहेत. त्याच अनुषंगाने लोणावळ्यात देखील पर्यटनावर बंदी आहे. पावसाळ्याच्या दिवसात लोणावळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. परंतु सध्या राज्य शासनाने लावलेल्या निर्बंधानुसार पर्यटकांना लोणावळ्यात नो एन्ट्री आहे. तरीदेखील काही हौशी पर्यटकांचे पाय लोणावळ्याकडे वळतात. मात्र लोणावळा पोलीस प्रशासन अशा पर्यटकांविरुद्ध कारवाई करत असल्याचे सध्याचे चित्र आहे.
(The water flowing from the drain of Bhushi dam receded tourists disappointed)
हे ही वाचा :
नवी मुंबईतील फळमार्केटमध्ये एका गाडीत भीषण स्फोट, परिसरात भीतीचं वातावरण