पुणे – शहरात वाढत्या गुन्हेगारी बरोबरच घरफोडीच्या घटनांमध्ये वाढत आहेत. शहारातील सातारा रोड परिसरात (satara road area) घरफोडी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांना पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर(Police) चोरट्यांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी दगडफेक करताच पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार(Police fired in self-defense) केला. सातारा रोडवरील चाफळकर कॉलनीत पहाटे साडेचार वाजताहे घटना घडली आहे. या कॉलनीतील ‘सानिया’ या अपार्टमेंटमध्ये चोरटे घरफोडी करण्यासाठी शिरले होते. तिसर्या मजल्यावर आवाज झाल्याने सुरक्षा रक्षकाला जाग आली. त्याला चोरटे आल्याचा सुगावा लागल्याने त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले. माहिती मिळताच प्रसंगवाधान राखत काही मिनिटातच पोलीस तेथे दाखल झाले.
सातारा रोडवरील चाफळकर कॉलनीत ‘सानिया’ या अपार्टमेंटमध्ये चोरटे घरफोडी करण्याच्या उद्देशानं शिरले होते. त्यानंतर सोसायटीच्या तिसरीत मजल्यावर आवाज आल्याने सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला काही तरी चुकीचे घडत असल्याची शंका आली त्याने तातडीने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच प्रसंगावधान राखतच घटनास्थळावर धाव घेतली. पोलिस घटना स्थळावर पोहचले त्या दरम्यान पोलीस जिन्यावरून खाली उतरत होते. प पोलीस आलेले दिसताचचोरट्यांनी आपल्याकडील चाकू पोलिसांना फेकून मारला. जवळ असलेले दगडही पोलिसांच्या दिशेने भिरकावले. याचा वेळी पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी हवेत गोळीबार केला. याचाच फायदा घेत चोरट्यांनी तिथून पोबारा केला. शेजारी असलेल्या ओढ्यातून पळून गेले. चोरट्यांना शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.