Pune crime | पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने बँक कर्मचाऱ्याचे अपहरण करत केले ‘हे’ कृत्य

दुचाकीवरून दोन अज्ञात तरुण आले व पीडित रोहित पवार यांच्या जवळ येऊन थांबले काही वेळातच त्यांची रोहित यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना मारहाण करत जबरदस्तीने दुचाकीवर बसवले.त्यानंतर आरोपी त्यांना घेऊन मुकुंदनगर येथील सत्यम शिवम बंगल्यासमोर घेऊन गेले.

Pune crime | पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने  बँक कर्मचाऱ्याचे अपहरण करत  केले  'हे' कृत्य
कुख्यात गुंड आणि मोक्काच्या आरोपींच्या संपत्तीवर नागपूर पोलिसांची कारवाई
Follow us
| Updated on: Mar 03, 2022 | 12:46 PM

पुणे – शहरात स्पर्धा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवेच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवाराने बँक कर्मचाऱ्याचे (bank employee) अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. बँक कर्मचाऱ्याच्या अपहरणानंतर पीडिताकडून आरोपाने ऑनलाईन पद्धतीनं तब्बल 67 हजार रुपये लूटल्याचे केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी(Police)  आरोपीला अटक करण्यात आली आहे. गणेश निवृत्त दराडे (वय 24, रा. कर्वेनगर, मूळ रा. बीड) असे आरोपीचे नाव असून आरोपी पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी (Competitive exam preparation) करत असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी रोहित ईश्वर पवार (वय 27, रा. रायगड) यांनी स्वारगेट पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे.

नेमकं काय घडलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारपीडित रोहित ईश्वर पवार (वय 27, रा. रायगड) अलिबाग येथील स्टेट बँकेत कार्यरत आहेत. घटनेच्या दिवशी रात्री साडेअकरा वाजता पुरंदर येथे जाण्यासाठी स्वारगेट एस टी स्टँडला आले होते. गाडीची वाट बघत असतानाच अचानक दुचाकीवरून दोन अज्ञात तरुण आले व पीडित रोहित पवार यांच्या जवळ येऊन थांबले काही वेळातच त्यांची रोहित यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना मारहाण करत जबरदस्तीने दुचाकीवर बसवले.त्यानंतर आरोपी त्यांना घेऊन मुकुंदनगर येथील सत्यम शिवम बंगल्यासमोर घेऊन गेले. तिथे त्यांना मारहाण करत मोबाईलवरील गुगल पे ऍप ओपन करून पासवर्ड सांगण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांच्याकडून पहिल्यांदा पाच हजार रुपये व नंतर 60 हजार रुपये व शेवटी २ हजार रुपये असे एकूण 67 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफरकरण्यास भाग पाडले. पुन्हा आरोपीने पवार यांना मारहाण करुन तिथून पोबारा केला. या घटनेमुळे घाबरले फिर्यादी गेले.

फिर्यादीने पोलिसात तक्रार केल्यानंतर त्याचे आधारे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करतअवघ्या काही तासात आरोपी गणेश दराडे याला अटक केली. अटकेची कारवाई केल्यानंतर तपास करत असताना आरोपी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्याचे उघड झाले. पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव अधिक तपास करीत आहेत.

राज्यपाल कोश्यारींचे ते भाषण जे सभागृहात होऊ शकलं नाही, वाचा संपूर्ण भाषण जशास तसं

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाचा धक्का; मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल नाकारला

संजय दौंड यांनी खरोखरच खाली डोकं वर पाय केलं, राज्यपालांच्या विरोधात निषेधासन

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.