MHADA exams postpone| ‘हा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रयत्न’, ‘प्रवेशपरीक्षा फी तून किती पैसे कमावले?’.. राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये संताप

आज राज्यभरात म्हाडाचा पेपर होणार होता. पेपर फुटल्याच संशय आल्यानंतर हा पेपर रद्द करण्यात आला. यामागचे कारणही तसेच आहे.  ज्या जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा डायरेक्टर रितेश देशमुख व एजंट संतोष हरकळ, अंकुश हरकळ दोन एजंट हे रात्री विश्रांतवाडी परिसरामध्ये पेपर देण्यासाठी आले होते. तेव्हाच पुणे सायबर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि अटक केली .

MHADA exams postpone| 'हा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रयत्न', 'प्रवेशपरीक्षा फी तून किती पैसे कमावले?'.. राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये संताप
jitendra aavhad
Follow us
| Updated on: Dec 12, 2021 | 12:59 PM

प्राजक्ता ढेकळे , पुणे – म्हाडा भरतीची परीक्षा ऐन वेळी रद्द करण्यात आल्याने उमेदवारांमध्ये महाविकास आघाडी सरकार विरुद्ध मोठा रोष निर्माण झाला आहे. आरोग्य भरतीप्रमाणे म्हाडाचा पेपर फुटण्याची धास्ती आधीच उमेदवारांच्या मनात निर्माण झाली होती मात्र गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सातत्यताने सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परीक्षा होणार , अफवा बळीपडू नका. कुठल्याही दलाला पैसे देऊ नका असे सांगत होते. मात्र परीक्षेच्या अवघ्या काही तास आधी सोशल मीडियाच्या माध्यमातूनव्हिडीओ शेअर करत ‘काही अपरिहार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे म्हाडाच्या व इतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशी माहिती आव्हाड यांनी दिली. या परीक्षेसाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून लाखो विद्यार्थी परीक्षा केंद्रावर दाखल झाले होते. सरकार सातत्याने अश्या प्रकारचा गलथान कारभार करत असले करत असले,तर विद्यार्थ्यांनी नेमके काय करायचे, थेट विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा हा प्रकार असल्याची भावना विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

प्रवेश फी तून किती कोटी कमावले ? म्हाडाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्याकडून भरमसाठ फी आकारण्यात आली होती. प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे फॉर्म भरण्यास सांगण्यात आले होते. यामध्ये खुल्या गटासाठी 500 रुपये फी आकारण्यात आली होती . तर आरक्षित गटासाठी साधारण 300 रुपये फी आकारण्यात आली आहे. या परीक्षेसाठी साधारण तीन लाख उमेदवारांनी परीक्षेचे फॉर्म भरले आहेत. यातील अनेक उमेदवारांनी एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज केला आहे. त्यामुळे नुसत्या प्रवेश फीमधूनच किती कोटी रूपये कमावले असा संतप्त विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.

एवढ्या पदांसाठी होणार होती भरती म्हाडाच्या भरती परीक्षा एकूण 565 पदांसाठी ही भरती परीक्षा घेण्यात येणार होती. यामध्ये कार्यकारी अभियंता स्थापत्य- 13, उप अभियंता स्थापत्य-13, मिळकत व्यवस्थापक/ प्रशासकीय अधिकारी- 02, सहाय्यक अभियंता स्थापत्य- 30, सहाय्यक विधी सल्लागार- 01, कनिष्ठ अभियंता स्थापत्य- 119, कनिष्ठ वास्तुशास्त्र सहाय्यक-06, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक -44, सहाय्यक- 18, वरिष्ठ लिपिक -73, कनिष्ठ लिपिक टंकलेखक – 207, लघुटंकलेखक – 20, भूमापक- 11, अनुरेखक- 06  पदे भरली जाणार होती.

सार्वजनिक वाहतूक सेवा बंद

म्हाडाच्या परीक्षेसाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून उमेदवार परीक्षा केंद्रावर दाखल झाले आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी एसटी वाहतूक सुरु नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थी दुचाकी अथवा खासगी वाहनाने प्रवेश करून परीक्षेसाठी आले होते. खासगी वाहनासाठी अवाजवी वाहतूक खर्चाचा भुर्दंडही विद्यार्थ्यांना सोसावा लागला आहे. मानसिक त्रास झाला तो वेगळाच.

पोलिसांनी अशी केली कारवाई

आज राज्यभरात म्हाडाचा पेपर होणार होता. पेपर फुटल्याच संशय आल्यानंतर हा पेपर रद्द करण्यात आला. यामागचे कारणही तसेच आहे.  ज्या जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा डायरेक्टर रितेश देशमुख व एजंट संतोष हरकळ, अंकुश हरकळ दोन एजंट हे रात्री विश्रांतवाडी परिसरामध्ये पेपर देण्यासाठी आले होते. तेव्हाच पुणे सायबर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि अटक केली . हा पेपर रात्रीतून रद्द करण्यात आला सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पेपर मोठ्या रकमेला विकला जाणार होता. हा पेपर होण्याआधीच पोलिसांच्या जाळ्यात मुख्य सूत्रधार अडकला याच्यामागे कोण मोठे सूत्रधार आहेत. याचाही तपास पोलिसांनी सुरू केला आहे. हा पेपर कशा पद्धतीने फुटला जाणार होता कशा पद्धतीने पुणे पोलिसांनी अटक केली. यापूर्वीही पुणे पोलिसांनी आरोग्य भरतीतील अनेक मोठे अधिकाऱ्यांना अटक केली आहे. त्याचबरोबर लष्कर भरतीचाही पर्दाफाश पुणे पोलिसांनी केलाय . यामागे क्लास चालवणारे मोठ्या प्रमाणावर असतात असा संशय पुणे पोलिसांना होता आणि त्याच आधारे म्हाडा पेपर फुटीचे बिंग फुटलंय. अशी माहिती पुणे पोलिस आयुक्तांनी दिली आहे.

Nashik| नाशिकमध्ये कोरोनामुळे 2 दिवसांत 3 मृत्यू; सध्या 309 रुग्णांवर उपचार सुरू

Gopinath Munde: अप्पा, वंचितांच्या कल्याणाचा वसा आजही आमच्यात आहे, तो प्राणपणाने जपणार! धनंजय मुंडेंची गोपीनाथ मुंडेंना आदरांजली

कोरोनामुळे झालेले नुकसान वेगाने भरून काढणाऱ्या निवडक अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश; अर्थ मंत्रालयाकडून अहवाल सादर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.