Pune : यंदा पुण्यातील सर्वात मोठी दहीहंडी शिंदे गटाची; कार्यक्रमातून जोरदार शक्तिप्रदर्शन, दिग्गज नेत्यांची हजेरी

आता पुण्यात (Pune) दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून शिंदे गट (Eknath Shinde) शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. शहरातील सर्वात मोठी दहीहंडी शिंदे गटाचे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी आयोजित केली आहे.

Pune : यंदा पुण्यातील सर्वात मोठी दहीहंडी शिंदे गटाची; कार्यक्रमातून जोरदार शक्तिप्रदर्शन, दिग्गज नेत्यांची हजेरी
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 9:17 AM

पुणे : महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. विविध पक्षातील नेत्यांकडून दरवर्षी राज्यभरात दहीहंडीच्या (Dahi handi) जंगी कार्यक्रमांचे आयोजन करून शक्तिप्रदर्शन करण्यात येते. दरम्यान आता पुण्यात (Pune) दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून शिंदे गट (Eknath Shinde) शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. शहरातील सर्वात मोठी दहीहंडी शिंदे गटाचे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी आयोजित केली आहे. पुण्यातील हांडेवाडीमध्ये धर्मवीर आनंद दिघे दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.  उत्सवाच्या माध्यमातून सात लाखांच्या रोख बक्षिसांसह विविध परितोषिकं दिले जाणार आहेत. या दहीहंडी उत्सवाला शिंदे गटाचे दिगग्ज नेते मंत्री तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, आमदार शहाजी पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या दहीहंडी उत्सवात राज्यभरातून मोठ्या संख्येने महिला दहीहंडी पथक सहभागी होणार असल्याची माहिती प्रमोद भानगिरे यांनी दिलीये, या दहीहंडीच्या माध्यमातून शिंदे गट जोरदार शक्तिपदर्शन करणार आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शक्तिप्रदर्शन?

निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. यात राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमधील महापालिका निवडणुकांचा समावेश आहे. पुणे महापालिकेची निवडणूक देखील होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षातील नेत्यांनी तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. आता शिंदे गटाच्या वतीने पुणे शहरात सर्वात मोठ्या दहीहंडीचे आयोजन करून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला शिंदे गटातील दिग्गज नेते  मंत्री तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, आमदार शहाजी पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची उपस्थिती असणार आहे.

हे सुद्धा वाचा

गोविंदा पथकाला दहा लाखांचं विमा संरक्षण

दहीहंडी उत्सवादरम्यान अनेकदा विशाल थर लावले जातात. यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. खाली पडून गोविंदाला दुखापत होते, काहींना कायमस्वरूपी अपंगत्व येते. अशा घटना टाळल्या जाव्यात तसेच त्यांना योग्य उपचार मिळावेत यासाठी आता शासनाने गोविंदांसाठी दहा लाख रुपये विमा संरक्षणाची घोषणा केली आहे. या विम्याचा  प्रीमियम शासनाकडून भरण्यात येणार आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.