Summer camps : दोन वर्षांनंतरचा उन्हाळी शिबिरांचा उत्साह; पुण्यात यंदाच्या शिबिरांत काय आहे खास? वाचा

उन्हाळा सुरू झाला आहे. कोविडच्या आधी जशी दर उन्हाळ्यात लहान मुलांसाठी विविध शिबिरे (Summer camps) घेतली जात होती, तशीच पुन्हा सुरू होणार आहेत. दरम्यान, बहुतेक शिबिरे मे अखेरपर्यंत सुरू राहतील. कारण यावर्षी मागणी खूप आहे, असे विविध ठिकाणच्या आयोजकांनी सांगितले आहे.

Summer camps : दोन वर्षांनंतरचा उन्हाळी शिबिरांचा उत्साह; पुण्यात यंदाच्या शिबिरांत काय आहे खास? वाचा
शालेय विद्यार्थी (प्रातिनिधिक छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 7:30 AM

पुणे : कोविडमुळे (Covid) मागील दोन वर्षांपासून बंद असलेली उन्हाळी शिबिरे, फेस्टिव्हल्स सुरू होत आहेत. मागील दोन वर्ष खेळणारी, बागडणारी मुले घरांत बंदिस्त होती. खेळणेच काय शाळादेखील घरातूनच सुरू होती. ऑनलाइन शिक्षणांमुळे मुलांमध्ये बंदिस्तपणाची भावना निर्माण झाली होती. आता अनेक निर्बंध शिथिल (Restrictions relaxed) करण्यात आले आहेत. मागील काही महिन्यांपासून शाळाही सुरू झाल्या. मास्कची सक्ती शिथिल करण्यात आली. अर्थात पुन्हा मास्कसक्ती होण्याचीही शक्यता आहे. दरम्यान, आता उन्हाळा सुरू झाला आहे. कोविडच्या आधी जशी दर उन्हाळ्यात लहान मुलांसाठी विविध शिबिरे (Summer camps) घेतली जात होती, तशीच पुन्हा सुरू होणार आहेत. दरम्यान, बहुतेक शिबिरे मे अखेरपर्यंत सुरू राहतील. कारण यावर्षी मागणी खूप आहे, असे विविध ठिकाणच्या आयोजकांनी सांगितले आहे.

स्वरूप बददले

लहान मुलांसाठी उन्हाळी शिबिरे आयोजित करणार्‍या बहुतेक प्री-स्कूल आणि नर्सरी शाळांनी सांगितले, की नेहमीच्या दरापेक्षा किमान तिप्पट मागणी तर झाली आहेच, पण शिबिरांमधील उपक्रमांचे स्वरूपही बदलले आहे. उन्हाळी शिबिरे हे लहान मुलांसाठी शालेय जीवन कसे असू शकते, याची पहिली झलक असल्याने आयोजकांनी सांगितले, की साथीच्या रोगाने आणि त्यानंतरच्या विलगीकरण आदी बाबींमुळे लहान मुलांसमोर आणलेल्या नवीन आव्हानांवर मात करण्यासाठी उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे.

पालक आग्रही

विविध ठिकाणच्या शिबिरे आयोजित करणाऱ्या संस्थांच्या मते, यंदा अतिरिक्त बॅचेस जाहीर कराव्या लागत आहेत. उन्हाळा त्रासदायक असला तरी मे महिन्यात अनेक पालक या शिबिरांसाठी आग्रही आहेत. मुलांसाठी अनुकूल अभ्यासक्रम आणि उपक्रमांमध्येही सुधारणा करावी लागत आहे.

शारीरिक ऊर्जा खर्च करणारे उपक्रम

पूर्वीच्या उन्हाळी शिबिरांमध्ये विविध खेळ, रेखाचित्रे, कथाकथनाची सत्रे असायची, ज्यात मुलांना एकाच ठिकाणी बसावे लागत होते. यावर्षी मात्र विविध खेळ, मैदानी खेळ, नृत्य आणि अशा शारीरिक हालचाली असलेले अनेक उपक्रम आहेत ज्यात त्यांना त्यांची ऊर्जा खर्च करण्याची आणि स्वतःला व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे.

आणखी वाचा :

Maharashtra scholarship exam 2022 : शिष्यवृत्ती परीक्षेला अखेर मुहूर्त! राज्यभरात एकाच दिवशी होणार परीक्षा; वाचा सविस्तर

Deccan queen : डेक्कन क्वीनचा आणखी एका रुपात! नव्या डायनिंग कोचसह प्रवाशांच्या सेवेत मेपासून धावणार..!

PCMC Voter list : तुमचं नाव मतदारयादीत आहे का? पिंपरी चिंचवडचे रहिवासी असाल तर महापालिकेतर्फे सुरू झालंय मतदारयादीचं काम!

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.