Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तुम्हाला मुलगा आहे की मुलगी?’ महाराष्ट्र केसरीच्या पंचांना धमकीचा फोन

महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य फेरीत नशिकचा मल्ल सिकंदर शेख (Sikandar Shikh) याच्यावर पंचांकडून अन्याय झाला, असा आरोप करण्यात येतोय.

'तुम्हाला मुलगा आहे की मुलगी?' महाराष्ट्र केसरीच्या पंचांना धमकीचा फोन
Follow us
| Updated on: Jan 16, 2023 | 6:24 PM

पुणे : महाराष्ट्र केसरीचे (Maharashtra Kesari) पंच मारुती सातव (Maruti Satav) यांना धमकीचे फोन आल्याची माहिती समोर आलीय. महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य फेरीत नशिकचा मल्ल सिकंदर शेख (Sikandar Shikh) याच्यावर पंचांकडून अन्याय झाला, असा आरोप करण्यात येतोय. या विषयावरुन गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर गदारोळ सुरु आहे. या विषयी दोन मतप्रवाह आहेत. दरम्यान, उपांत्य फेरीत सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड आमनेसामने आले होते. दोघांच्या लढतीदरम्यान महेंद्र गायकवाडला पंचांकडून चुकीच्या पद्धतीने चार गुण देण्यात आले, असा आरोप करण्यात येतोय. याच वादावरुन महाराष्ट्र केसरीचे पंच मारुती सातव यांना एका पैलवानाकडून धमकीचा फोन आल्याचं स्पष्ट झालंय.

मारुती सातव यांनी धमकीचा फोन आल्यानंतर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित फोन करणाऱ्या व्यक्तीने सातव यांच्याशी बोलताना आपली ओळख पैलवान संग्राम कांबळे असं नाव असल्याचं सांगितलंय.

धमकीचा आलेल्या फोनमध्ये नेमकं संभाषण काय झालं?

पै संग्राम कांबळे : पैलवान संग्राम कांबळे बोलतोय पंच मारुती सातव : हो, बोला की! पै संग्राम कांबळे : सिकंदरच्या कुस्तीला तुम्हीच पंच होता ना? पंच मारुती सातव : हो..हो… पै संग्राम कांबळे : तुम्हाला मुलगा आहे की, मुलगी आहे? का? पै संग्राम कांबळे : सांगा की! पंच मारुती सातव :बोला की तुम्ही, तुम्हाला काय म्हणायचंय? मुलगा आहे पै संग्राम कांबळे : त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगा की, तुम्ही दिलेला निर्णय हा योग्य होता पंच मारुती सातव :कांबळे पैलवान, ऐका! पै संग्राम कांबळे : तुम्ही आमचं ऐका आता. तुमचं काल आम्ही ऐकलं. बघितलं तुम्हा काय निर्णय दिला तो. तुम्ही निर्णय दिला तो चुकीचा दिला आहे. तुम्ही दबावाला बळी पडून निर्णय दिलाय. पंच मारुती सातव : कुणाच्या दबावावर? मी कुणाच्या बापाला घाबरत नाही पै संग्राम कांबळे : जिथे दोन पॉईंट होते तिथे चार पॉईंट तुम्ही दिले. पंच मारुती सातव : माझं ऐकाना पै संग्राम कांबळे :सिकंदवर पैलवानावर किती मोठा अन्याय झालाय पंच मारुती सातव : अहो ज्युरीकडे निर्णय गेला ना! पै संग्राम कांबळे : तुमचा निर्णय येण्याअगोदर चार गुण मिळाल्याचं घोषित करण्यात आलं. सिकंदर विजय होत असताना तुम्ही महेंद्रला जास्त गुण दिले. हे कधीही खपवून घेणार नाही. तुम्हाला लाज वाटली पाहिजे पंच मारुती सातव : व्यवस्थित बोला पै संग्राम कांबळे : मी व्यवस्थितच बोलतोय

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.