भरधाव गाडीवरील नियंत्रण सुटले, कार ट्रकला धडकली अन्…

मुंबईहून पुण्याच्या दिशेने तिघे जण कारने चालले होते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर चालकाचे अतिवेगात कारवरील नियंत्रण सुटले.

भरधाव गाडीवरील नियंत्रण सुटले, कार ट्रकला धडकली अन्...
मुंबई-पुणे महामार्गावर कारचा भीषण अपघातImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 17, 2023 | 10:09 AM

पुणे / रणजित जाधव : भरधाव कारने ट्रकला मागून धडक दिल्याने भीषण अपघाताची घटना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर घडली आहे. सकाळी 7 ते 7:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात तीन ठारपैकी दोन मृतदेहांची ओळख पटली असून, अन्य एकाची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. विजय विश्वनाथ खैर आणि राहुल कुलकर्णी अशी अपघातात मयत दोघांची नावं आहेत. ते सातारा येथील रहिवासी आहेत. अपघात इतका भयानक होता की, यात गाडीचाही चक्काचूर झाला.

अनियंत्रित कार ट्रकला धडकल्याने अपघात

मुंबईहून पुण्याच्या दिशेने ही कार चालली होती. यादरम्यान उर्से गावच्या परिसरात आडे गावाजवळ सकाळी 7 ते 7.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अतिवेगात गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले. यानंतर कार थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. या ट्रकचे टायर फुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला थांबला होता. ही धडक एवढी भीषण होती की त्यातील चालकासह दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तिघांचे शीर धडावेगळे झाले.

महामार्ग पोलिसांकडून वाहतूक सुरळित

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग आणि शिरगाव परंदवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महामार्ग पोलिसांनी यंत्रणांच्या मदतीने यातील वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे. तीनही मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आले. मृतांची अधिक माहिती पोलीस घेत आहेत.

हे सुद्धा वाचा

सोलापुरात मिनी ट्रक आणि दुचाकीचा अपघात

सोलापूरजवळील देगाव येथे कांद्याने भरलेल्या मिनी ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात मोटर सायकलस्वार जागीच ठार झाला. सोलापूर शहराजवळ असलेल्या देगाव येथे हॉटेल समृद्धी गार्डन समोर हा अपघात झाला. नारायण फडतरे असे मृत दुचाकी चालक युवकाचे नाव आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.