AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री काम आटोपून जेवायला गेले होते तिघे मजूर, पण वाटेतच काळाचा घाला

तिघेही परप्रातातून कामानिमित्त पुण्यात आले. रात्री काम झाल्यावर जेवायला गेले. जेवून घरी परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.

रात्री काम आटोपून जेवायला गेले होते तिघे मजूर, पण वाटेतच काळाचा घाला
जुन्नरमध्ये ट्रॅव्हल्सच्या धडकेत बाईकवरील तिघे ठारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 1:09 PM

जुन्नर : नगर-कल्याण महामार्गावर वडगाव आनंद गावच्या शिवारात मोटारसायकलला टेम्पो ट्रॅव्हल्स बसने दिलेल्या धडकेत तिघे जण जागीच ठार झाले. रात्री अकरा वाजण्याच्या ही घटना सुमारास घडली असून, तिघेही मयत हे परप्रांतीय आहेत. तिघेही आळेफाटा येथे एका खाजगी बेकरीत काम करत होते. मयतांमध्ये एका अल्पवयीन मजुराचा समावेश आहे. योगेश रामकुमार, चाहात बाबुराव आणि संजीव कुमार अशी तिघा मयतांची नावे असून, सर्व मूळचे उत्तरप्रदेशातील रहिवासी आहेत. अपघाताची माहिती मिळताच आळेफाटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गुरुवारी सकाळी आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

जेवण करुन परतत असताना अपघात

आळेफाटा येथे असलेल्या एका खाजगी बेकरीत काम करणारे मजूर बुधवारी रात्री कल्याण रोडवर एकाच दुचाकीने जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण करुन रात्री सुमारे साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घरी परतत होते. यावेळी विरुद्ध दिशेने आलेल्या टेम्पो ट्रॅव्हल्स बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तिघांच्याही डोक्याला गंभीर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. तिघेही मूळचे उत्तर प्रदेशाती रहिवासी असून, कामानिमित्त महाराष्ट्रात राहत होते.

इगतपुरीजवळ अपघातात दोन साध्वींचा मृत्यू

मुंबई नाशिक महामार्गावर हॉटेल ऑरेंज समोर कंटेनरच्या धडकेत दोन जैन महिला साध्वी यांचा मृत्यू झाला आहे. कंटेनरने पिकअप आणि ओमनी कारला धडक दिल्यानंतर पायी चालणाऱ्या महिला साध्वींना धडक दिली. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. नाशिकला चातुर्मास करण्यासाठी पायी जात असताना अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

हे सुद्धा वाचा

भाजप माजी नगरसेवकाच्या आजी-माजी समर्थकांमध्ये राडा, तलवारी, रॉड अन्...
भाजप माजी नगरसेवकाच्या आजी-माजी समर्थकांमध्ये राडा, तलवारी, रॉड अन्....
9 तारखेच्या आतच काम होणार तमाम? पाकिस्तानला PM मोदींचा मोठा इशारा काय?
9 तारखेच्या आतच काम होणार तमाम? पाकिस्तानला PM मोदींचा मोठा इशारा काय?.
HSC : ऑल द बेस्ट पोरांनो, बारावीचा आज निकाल, कुठे पाहता येणार रिझल्ट?
HSC : ऑल द बेस्ट पोरांनो, बारावीचा आज निकाल, कुठे पाहता येणार रिझल्ट?.
जंगल मंगल कॅम्पचे सॅटेलाइट फोटो व्हायरल
जंगल मंगल कॅम्पचे सॅटेलाइट फोटो व्हायरल.
भारताचा आणखी एक कठोर निर्णय, पाकिस्तानची कोंडी वाढली
भारताचा आणखी एक कठोर निर्णय, पाकिस्तानची कोंडी वाढली.
अटारी बॉर्डरच्या जवळील गावात सापडली संशयास्पद वस्तू
अटारी बॉर्डरच्या जवळील गावात सापडली संशयास्पद वस्तू.
मुंडेंकडून 18 तुकडे करण्याची धमकी; करुणा शर्मांचा गंभीर आरोप
मुंडेंकडून 18 तुकडे करण्याची धमकी; करुणा शर्मांचा गंभीर आरोप.
पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?
पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?.
कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली
कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली.
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार.