पुणे- उसाच्या ट्रॉलीला भरधाव कराची धडक बसून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात बारामतील प्रसिद्ध सराफा व्यापारी व्यावसायिक श्रेणिक भंडारी यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. बारामती-मोरगाव रस्त्यावर तरडोलीनजिक हा अपघात झाला आहे.
या अपघातात अश्विनी श्रेणिक भंडारी (वय 48), मिलिंद श्रेणिक भंडारी (वय 24), कविता उदय शहा (वय 62 रा. सर्व सुभाष चौक बारामती) बिंदिया सुनील भंडारी या गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. त्यांना पुण्यातल्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अशी घडली घटना
भंडारी कुटुंबीय धार्मिक कार्यक्रमासाठी पुण्याला गेले आहे. कार्यक्रम संपवून बारामतीला निघालेले असताना तरडोलीपासून पुढे आल्यानंतर उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अंदाज न आल्याने भंडारी कुटुंबियाच्या कारने ट्रॉलीला जोरदार धडक दिली. त्याने हा अपघात झाला. गाडीची धडक जोरदार होती. त्यामुळे तिघांचा मृत्यू झाला असून एक महिला यात गंभीर जखमी झाली आहे. या अपघाताने भंडारी व कळसकर कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. बारामती परिसरात धार्मिक कुटुंब म्हणून त्यांची ओळख होती. रात्री अपघाताची माहिती मिळताच बारामतीतील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. श्रमिक भंडारी हे बारामतीतले सराफ व्यावसायिक आहेत. हे कुटुंबीय अत्यंत मनमिळावू आणि धार्मिक स्वभावाचे आहेत. त्यामुळे बारामतीकरांमध्ये शोककळा पसरली आहे.
Karjat Nagar Panchayat Election 2022 | कर्जतमध्ये रोहित पवारांची जादू, राष्ट्रवादीची एक हाती सत्ता