पुणे शहराजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात, दोन कंटेनरच्या अपघातानंतर दुचाकीला धडक

एक कंटेनर पुण्याच्या दिशेने जात होता. त्यावेळी उरळी कांचन येथील एलिट चौक ते तलवाडी चौक दरम्यान अचानक मागून येणाऱ्या कंटेनरने धडक दिली.

पुणे शहराजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात, दोन कंटेनरच्या अपघातानंतर दुचाकीला धडक
दोन दुचाकींच्या धडकेत दोघांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Feb 17, 2023 | 3:00 PM

पुणे : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Solapur National Highway) पुन्हा मोठा अपघात झाला आहे. पुण्याजवळील उरळी कांचन गावाजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात (Accident) झाला. ही घटना शुक्रवार 17 फेब्रुवारी पहाटे 5 वाजता घडली. अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. अपघातस्थळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांत एक्स्प्रेस हायवेवर अपघातात अनेकांना आपला जीव गमावला आहे. तर कित्येक जण जायबंदी झालेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक कंटेनर पुण्याच्या दिशेने जात होता. त्यावेळी उरळी कांचन येथील एलिट चौक ते तलवाडी चौक दरम्यान अचानक मागून येणाऱ्या कंटेनरने धडक दिली. या भीषण धडकेने कंटेनर दुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजूने सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर आला आणि सोलापूरच्या दिशेने उभ्या असलेल्या एका मोठ्या चारचाकी वाहनाला धडकला. या विचित्र धडकेत तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे.

हे सुद्धा वाचा

नेमका कसा झाला अपघात

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हवेली तालुक्यातील उरुळी कांचन गावाजवळून जात असताना पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने धडक दिली. ही संपूर्ण घटना अलाईड चौक ते तलवाडी चौक दरम्यान घडली. या धडकेमुळे कंटेनर सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुभाजकाच्या पलीकडे येऊन दुसऱ्या चारचाकी वाहनावर आदळला. त्यामुळे तीन वाहनांच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. मात्र पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. त्यामुळे अपघातस्थळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.

अपघाताची आकडेवारी चिंताजनक

2022 साली राज्यात एकूण 12 हजार 553 भीषण अपघात झाले. त्यात 13 हजार 528 जणांनी जीव गमावला तर 10 हजार 877 जण गंभीर जखमी झाले. यात राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 3992 तर राज्य महामार्गावर झालेल्या अपघातात 3411 जणांनी प्राण गमावलाय. तर इतर मार्गावर जीव गमावलेल्यांचा आकडा हा 5724 इतका आहे. एक्स्प्रेस हायवेवर अपघातात अनेकांना आपला जीव गमावला आहे. तर कित्येक जण जायबंदी झालेत.

भरधाव वेगानं बेदरकारपणे वाहन चालवणं, टायर फुटणं, लेन कटिंग, ओव्हरटेंगिक यामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर वारंवार अपघाताच्या घटना घडत असल्याचं समोर आलंय. आतापर्यंत झालेल्या अपघाताच्या वेळा पाहिल्यास, सर्वाधिक अपघात हे रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या सुमारास झाल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे.

भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....