वर्षभरात रेल्वेत किती फुकटे प्रवाशी भेटले वाचून बसेल धक्का, रेल्वेच्या कोणत्या विभागाने केली बंपर कमाई

फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी मध्य रेल्वेकडून वेळोवेळी मोहीम राबवली जाते. रेल्वेच्या या प्रयत्नांमुळे फुकट प्रवास करणाऱ्यांना चांगला दंड बसतो. परंतु त्यानंतही तिकीट न काढता प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. वर्षभरातील आकडेवारीवरुन हे स्पष्ट होतेय.

वर्षभरात रेल्वेत किती फुकटे प्रवाशी भेटले वाचून बसेल धक्का, रेल्वेच्या कोणत्या विभागाने केली बंपर कमाई
रेल्वे तिकीट तपासणीImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us
| Updated on: Mar 29, 2023 | 8:38 AM

पुणे : भारतीय रेल्वे हा सर्वात स्वस्त आणि मस्त वाहतुकीचा पर्याय आहे. परंतु त्यानंतरही रेल्वेत तिकीट न काढता प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी रेल्वेकडून वेळोवेळी मोहीम राबवली जाते. रेल्वेच्या या प्रयत्नांमुळे फुकट प्रवास करणाऱ्यांना चांगला दंड बसतो. परंतु त्यानंतरही या प्रवाशांची संख्या कमी होत नाही. यामुळे गेल्या वर्षभरात फुकट्या प्रवाशांकडून रेल्वेने बंपर दंड वसुल केला आहे. त्यात सर्वाधिक कमाई मुंबई विभागाने केली आहे. म्हणजेच देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

वर्षभरात ३०० कोटींचा दंड 

रेल्वेतून सर्व तिकीट धारक आणि पासधारकांना आरामदायी प्रवास व्हावा आणि त्यांना उत्तम सेवा मिळावी यासाठी फुकट्या प्रवाशांना आळा घालण्याचे काम मध्य रेल्वेकडून सुरु आहे. रेल्वेकडून सर्व विभागांमधील उपनगरीय, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा, विशेष गाड्यांमध्ये नियमित तिकीट तपासणी केली जाते. तिकीट तपासणीच्या कामगिरीत मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. एकूण ४६.३२ लाख प्रकरणे दंडित करण्यात आली आणि आर्थिक वर्ष २२-२३ मध्ये ३०० कोटी रुपये कमावले आहेत.

हे सुद्धा वाचा

मुंबईने ओलांडला १०० कोटी रुपयांचा टप्पा

तिकीट तपासणी कमाईमध्ये मध्य रेल्वेने सर्व विभागीय रेल्वेंना मागे टाकून मुंबईने प्रथम क्रमांक पटकवला आहे. रेल्वेने एकूण ३०० कोटींचा दंड वसूल केला आहे, त्यात एकट्या मुंबई विभागाने १०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

• मुंबई विभागाने ₹१०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे आणि १९.५७ लाख प्रकरणांमधून ₹१०८.२५ कोटी कमावले आहेत.

• पुणे विभागाने ३.३६ लाख प्रकरणांमधून ₹ २४.२७ कोटी कमावले आहेत.

• नागपूर विभागाने ६.१६ लाख प्रकरणांमधून ₹ ३९.७० कोटी कमावले आहेत

• भुसावळ विभागाने ९.०६ लाख प्रकरणांमधून ₹ ७०.०२ कोटी कमावले आहेत.

• सोलापूर विभागाने ५.२७ लाख प्रकरणांमधून ₹ ३३.३६ कोटी कमावले आहेत.

• PCCM पथकाने २.९१ लाख प्रकरणांमधून ₹ २४.६५ कोटी कमावले आहेत.

हे आहेत टॉप ३

मध्य रेल्वेच्या २० तिकीट तपासकांनी वैयक्तिकरीत्या एक कोटींहून अधिक रकमेचा दंड वसूल केला आहे. यात प्रथम तीन तिकीट तपासणी करणारे डी. कुमार यांनी २२,८४७ प्रकरणांमधून २ कोटी ११ लाख ७ हजार ८६५ रुपये दंड वसूल केला आहे. दुसऱ्या क्रमांकावर एस. बी. गलांडे आहेत. त्यांनी २२,३८४ प्रकरणांमधून १ कोटी ९७ लाख ८७ हजार ४७० रुपये दंड वसूल केला आहे. तिसऱ्या क्रमांकावर सुनील नैनानी आहेत. त्यांनी १८,१६५ प्रकरणांमधून १ कोटी ५९ लाख ९८ हजार १९० रुपयांची कमाई करण्याचा मान मिळाला आहे.

सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.