Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर किवळे ते सोमाटणे दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक, किती वेळ असणार ब्लॉक? पर्यायी रस्ता कोणता? वाचा…

पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक जुन्या महामार्गे सोमाटणे येथून ती पुन्हा सोमाटणे ते मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर उर्से टोलनाक्यावर वळविण्यात येणार आहे. सर्व वाहन चालक आणि प्रवाशांनी या कालावधीदरम्यान याच पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर किवळे ते सोमाटणे दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक, किती वेळ असणार ब्लॉक? पर्यायी रस्ता कोणता? वाचा...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रॅफिक ब्लॉकImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 4:00 PM

मावळ, पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai Pune Expressway) किवळे ते सोमाटणे दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. दुपारी 12 ते 2 ओव्हर हेड गॅन्ट्री बसविण्यासाठी एक्स्प्रेस हायवेवर हा ब्लॉक घेण्यात येत आहे. यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर स्वागत फलक लावण्यासाठी हा मेगा ब्लॉक (Mega block) असणार आहे. या कालावधीदरम्यान पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक जुन्या महामार्गे सोमाटणे येथून ती पुन्हा सोमाटणे ते मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर उर्से टोलनाक्यावर वळविण्यात येणार आहे. सर्व वाहन चालक आणि प्रवाशांनी या कालावधीदरम्यान याच पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांच्या (Maharashtra State Road Development Corporation) वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, यामुळे वाहनचालकांची काहीशी गैरसोय होणार आहे.

पर्यायी मार्ग वापरण्याच्या सूचना

आज पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर 12 ते 2 या दोन तासांसाठी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. पिंपरी चिंचवड पोलीस त्याचप्रमाणे एमएसआरडीसीचे अधिकारी याठिकाणी दाखल झाले आहेत. कामास सुरुवात झाली आहे. वाहनचालकांची गैरसोय होऊ नये, म्हणून आधीच याठिकाणी कर्मचारी दाखल होत पर्यायी मार्ग वापरण्याच्या सूचना देताना दिसून येत होते. काम सुरळीत पार पडावे, तसेच वाहनचालकांना कोणताही त्रास होऊ नये, याकरिता खबरदारी घेण्यात येत होती. सुरक्षेचीदेखील काळजी पोलीस आणि एमएसआरडीसीकडून घेण्यात येत होती.

वाहनचालकांची गैरसोय?

सध्या पाऊस कमी झाला आहे. मात्र वीकेंड असल्याने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. दुपारच्या सत्रात काम केले जात असल्याने सुरुवातीला तरी वाहनांची कमी वर्दळ दिसून आली. दुपारी दोनपर्यंत ब्लॉक असणार आहे. या दरम्यान ओव्हरहेड गॅन्ट्री बसविली जाणार आहे. तोवर जुन्या महामार्गावरून प्रवास करावा लागणार आहे. मात्र प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून पिंपरी चिंचवड पोलीस त्याचप्रमाणे एमएसआरडीसीचे कर्मचारी काम सुरू असलेल्या ठिकाणी हजर आहेत. वाहनचालकांना काही समस्या असल्यास त्यांच्यामार्फत त्या दूर केल्या जाणार आहेत.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.