पुणे, दौंड प्रवास होणार वेगवान, कारण रेल्वेने घेतला हा महत्वाचा निर्णय
pune daund train : पुणे-दौंड रेल्वे मार्गावर चांगला निर्णय रेल्वेने घेतला आहेत. या मार्गावर गेल्या काही दिवसांपासून अनेक कामे सुरु होती. आता या मार्गावरुन वेगाने रेल्वे धावणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ दहा मिनिटांनी वाचणार आहे.
पुणे | 27 ऑगस्ट 2023 : पुण्यावरुन रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी चांगली बातमी आहे. पुणे-दौंड प्रवास करणाऱ्या लोकांच्या वेळेत आता बचत होणार आहे. यासंदर्भातील निर्णय पुणे रेल्वे मंडळाने घेतला आहे. पुणे-दौड दरम्यान अनेक तांत्रिक चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर या मार्गावर ताशी १३० किलोमीटर या वेगाने रेल्वे धावण्याचा निर्णयास परवानगी देण्यात आली आहे. प्रथमच या मार्गावर या वेगाने रेल्वे धावणार आहे. यामुळे रेल्वे प्रवास १० मिनिटांनी कमी होणार आहे.
का घेतला निर्णय
पुणे-दौंड रेल्वे मार्गावर गेल्या काही दिवसांपासून अनेक कामे होत होती. या मार्गावरील रुळांची क्षमता वाढवली गेली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी या मार्गाची तांत्रिक तपासणी केली. त्यानंतर त्यात पुन्हा काही बदल करण्यात आले. त्याप्रमाणे पुणे रेल्वे प्रशासनाने काही बदल केले गेले. त्यानंतर या मार्गावर रेल्वे गाड्यांचा वेग वाढवण्यास परवानगी देण्यात आली. आता पुणे-दौंड दरम्यान ताशी १३० किलोमीटर वेगाने रेल्वे धावणार आहे. यासंदर्भातील आदेश मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी काढले आहेत.
कधीपासून होणार अंमलबजावणी
पुणे-दौंड रेल्वेमार्गावर १३० किलोमीटर वेगाने रेल्वे धावणार आहेत. या गाड्या सोमवारपासून १३० किमी प्रतितास या वेगाने धावणार आहेत. यामुळे वेळेची बचत होणार आहे. हा निर्णय सर्व प्रवासी गाड्यांना लागू असेल. पुणे-दौंड दरम्यान रेल्वेकडून आता विविध सुविधाही दिल्या जात आहेत. पुणे ते दौंड दरम्यान सध्या मेमू सुरु आहे. आता या मार्गावर लवकरच लोकल सेवा सुरु होणार आहे. त्यासाठी मुंबईवरुन पुणे विभागाला देण्यासाठी इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट मिळणार आहे.
या गाडीचा विशेष दर्जा रद्द
पुणे-अमरावती एक्स्प्रेस ही दौंड मार्गे जाणारी विशेष गाडी आता नियमित करण्यात आली आहे. यामुळे या गाडीसाठी लागणारे विशेष गाडीचे भाडे रद्द केले गेले. कोरोना काळात या गाडीला विशेष गाडीचा दर्जा दिला होता. ११४०५ या क्रमांकाची पुणे-अमरावती एक्स्प्रेस शुक्रवारी आणि रविवारी रात्री १०.५० वाजता पुणे येथून निघणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता अमरावतीला पोहोचेल.