Train Medical Help| रेल्वेने प्रवासाला निघताय मग… जाणून घ्या ‘रेल्वेतील वैद्यकीय मदतीची’ नेमकी प्रक्रिया
रेल्वेतही वैद्यकीय सेवा मिळणार आहेत. रेल्वेतील प्रवाश्यांना यापुढे कोणत्याही प्रकारची वैद्यकीय समस्या निर्माण झाली तर त्याला वैद्यकीय मदत मिळणार आहे. यासाठी रेल्वेत डॉक्टर कॉल सुरु करण्यात आला आहे.
पुणे- सर्वसामान्य नागरिकांसाठी रेल्वेचा प्रवास हा कायम आरामदायी असा असतो. अनेकदा रेल्वेतून लांबपल्याचा प्रवास करताना वातावरण बदलामुळे तब्येत बिघडण्याच्या समस्या निर्माण होतात. बऱ्याचदा लहान मुले आजारी पडतात., जेष्ठ व्यक्तींनाही त्रास जाणवतो. अश्यावेळी प्रवाश्यांची भांबेरी उडते. काय करावे कळत नाही.याच समस्या सोडवण्यासाठी आता रेल्वेतही वैद्यकीय सेवा मिळणार आहेत. रेल्वेतील प्रवाश्यांना यापुढे कोणत्याही प्रकारची वैद्यकीय समस्या निर्माण झाली तर त्याला वैद्यकीय मदत मिळणार आहे. यासाठी रेल्वेत डॉक्टर कॉल सुरु करण्यात आला आहे . वैद्यकीय मदत देत असताना एखाद्या प्रवाश्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली त तीही पूर्ण केली जाणार आहे.
अशी मिळेल मदत
- एखाद्या प्रवाश्याला वैद्यकीय मदत हवी असेल तर त्याला रेल्वेतील तिकीट पर्यवेक्षकाकडे संपर्क साधावा लागेल.
- यानंतर तिकीट पर्यवेक्षक ही माहिती रेल्वे नियंत्रण कक्षाला देईल.
- या माहितीच्या आधारे पुढील रेल्वे स्थानकावर गरजू प्रवाश्याला वैद्यकीय मदत मिळणार आहे.
- ही मदत पूर्ण निशुल्क स्वरूपात मिळणार आहे.
- डॉक्टर प्रवाश्याच्या सीटवर जाऊन त्याची तपासणी करतात.
- रुग्णवाहिकेची गरज असल्यास तीही पुरवली जाते.
- सर्वात महत्वाचे म्हणजे रुग्णाची तपासणी होईपर्यंत रेल्वे थांबवली जाते.
सध्या सुरु असललेल्या रेल्वे – मुंबई- कोल्हापूर कोयना एक्सप्रेस – पुणे – इंदोर सिंहगड एक्सप्रेस – मुंबई -पुणे – सिंहगड एक्सप्रेस – पनवेल -नांदेड एक्सप्रेस
यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. यामुळे गरजू प्रवाशांना मदत मिळते. मदतीसाठी प्रवाश्यांना मदत मिळवण्यासाठी तिकीट पर्यवेक्षाकांसोबत संपर्क साधावा अशी माहिती पुणे रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारि मनोज झंवर यांनी दिली आहे.
आहारपद्धतीमुळे भारतीयांना कॅन्सरचा धोका कमी… नक्की कारण काय जाणून घ्या एका क्लिकवर
शाह म्हणाले, राजीनामा देऊन मैदानात या, आता राऊतांचं जशास तसं उत्तर, शिवसेनेशिवाय भाजपचे 105 अशक्य?