आनंदाची बातमी! पाच वर्षांमध्ये पुण्यातील झाडांची संख्या 8.5 लाखांनी वाढली

Tree plantation | 2020-21च्या पर्यावरण सद्यःस्थिती अहवालानुसार, शहरातील वृक्षांची संख्या 47 लाख 13 हजारांवर पोचली असून, लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण प्रतिव्यक्ती 1.39 वृक्ष इतके आहे.

आनंदाची बातमी! पाच वर्षांमध्ये पुण्यातील झाडांची संख्या 8.5 लाखांनी वाढली
Follow us
| Updated on: Aug 23, 2021 | 7:55 AM

पुणे: पाच वर्षांच्या कालावधीत पुणे शहरातील वृक्षसंख्येत जवळपास साडेआठ लाखांची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. वृक्षराजी आणखी वाढविण्याच्या हेतूने शहरातील टेकड्यांवर हरितक्षेत्र विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी 26.25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

2020-21च्या पर्यावरण सद्यःस्थिती अहवालानुसार, शहरातील वृक्षांची संख्या 47 लाख 13 हजारांवर पोचली असून, लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण प्रतिव्यक्ती 1.39 वृक्ष इतके आहे. 2016-17 च्या पर्यावरण अहवालानुसार, शहरातील वृक्षांची संख्या 38 लाख 60 हजार इतकी होती. तर लोकसंख्येच्या तुलनेत वृक्षांचे हे प्रमाण प्रतिव्यक्ती 1.23 वृक्ष इतके होते.

महापालिकेने केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत शहरातील वृक्षांच्या संख्येत 22.5 टक्क्यांनी वाढ झाली. ‘जीपीएस’ प्रणालीच्या साहाय्याने पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात करण्यात वृक्षगणना करण्यात आली. त्यानुसार शहरात वृक्षांच्या एकूण 429 प्रजाती आढळून आल्या आहेत. नुकत्याच समाविष्ट झालेल्या 23 गावांमधील वृक्षांची गणना यामध्ये झालेली नाही.

पुणे विद्यापीठाच्या ‘स्वच्छ वारी निर्मल वारी’ कार्यक्रमाच्या गैरव्यवहाराची होणार चौकशी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) 2019 मध्ये झालेल्या ‘स्वच्छ वारी, निर्मल वारी’ (Swachh Wari Nirmal Wari 2019) या कार्यक्रमातील गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश विभागीय सहसंचालकांनी दिले आहेत. उच्च शिक्षण विभागाने या चौकशीसाठी एक सदस्यीस समिती नियुक्त केली आहे. 8 दिवसांमध्ये याबाबत माहिती सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ‘स्टुडंट्स हेल्पींग हँड्स’ (Students Helping Hands) संघटनेने याबाबत सातत्यानं पाठपुरावा करत निवेदने दिली होती.

स्वच्छ वारी निर्मल वारी हा कार्यक्रम ३० जून २०१९ ला पार पडला होता. या कार्यक्रमाला तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. तर या कार्यक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही करण्यात आली होती. या उपक्रमासाठी विद्यापीठाने 69 लाख रुपयांची तरतुद केली होती.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.