Uorfi Javed : उर्फी जावेद मुस्लिम असल्यानेच भाजपकडून टार्गेट?; तृप्ती देसाई म्हणाल्या, तर आम्ही तिच्या…
उर्फी जावेदला पोलिसांनी नोटीस बजावली होती. त्यानुसार ती पोलीस ठाण्यात गेली होती. यावेळी तिने माझ्या पसंतीचे कपडे परिधान करण्याचा मला संविधानाने अधिकार दिला आहे.
मुंबई: मॉडेल तृप्ती सावंत आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद अजून काही थांबलेला नाही. उर्फी जावेदने या प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेतली. त्यानंतर चित्रा वाघ यांनी उर्फीवर टीका केली. तिने काहीही करावं. कुठेही जावं. पण नीट कपडे घालून जावं, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. आता या वादात भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी उडी घेतली आहे. उर्फी जावेद मुस्लिम असल्यानेच तिला भाजपकडून टार्गेट केलं जातंय का? हे तपासलं पाहिजे. तसं असेल तर आम्ही तिच्या पाठी उभं राहू, असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.
उर्फी जावेदला पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्याबाबत तृप्ती देसाई यांना विचारण्यात आलं असता त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. आपला देश संविधानानुसार चालतो. उर्फीने काय कपडे घालावे आणि काय घालू नये हा तिचा प्रश्न आहे. या आधी अनेक अभिनेत्रींनी बोल्ड कपडे घातले आहेत.
त्यावेळी कोणी काही प्रश्न विचारले नाही. पण उर्फी जावेदलाच भाजप का टार्गेट करत आहे?; असा सवाल करतानाच उर्फी केवळ मुस्लिम असल्याने भाजप तिला टार्गेट करत आहे का? हे आपण तपासलं पाहिजे, असं तृप्ती देसाई म्हणाले.
मविआच्या काळात केतकी चितळलेा त्रास दिला. तसे उर्फी जावेदला वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये फिरवले जाईल. सत्तेचा हाच दुरुपयोग केला जात आहे. चित्राताईंना माझं एकच सांगणं की, उर्फी जावेदच का?
कंगना राणावत, मल्लिका शेरावत, दीपिका पदुकोण अशा अभिनेत्री सुद्धा बोल्ड कपडे घालतात. त्यांच्यावर सुद्धा कारवाई करा, असं सांगतानाच फक्त उर्फीलाच टार्गेट करत असाल तर आम्ही उर्फी सोबत आहोत, असं त्या म्हणाल्या.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य संविधानाने दिलं आहे. ज्याचं सरकार असत त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जाते. सत्तेचा हा दुरुपयोग केला जातो. पोलिसांना विनंती आहे की, संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्यचा अधिकार दिला आहे तर योग्य तो न्याय मिळालाय पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, उर्फी जावेदला पोलिसांनी नोटीस बजावली होती. त्यानुसार ती पोलीस ठाण्यात गेली होती. यावेळी तिने माझ्या पसंतीचे कपडे परिधान करण्याचा मला संविधानाने अधिकार दिला आहे.
त्यामुळे मी कोणते कपडे घालावे आणि घालू नये हे इतर कोणी ठरवू शकत नाही, असा जबाब तिने पोलिसांना दिल्याचं सांगितलं जातं. उर्फीच्या या जबाबानंतर पोलीस काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, उर्फी तिच्या वकिलासोबत पोलीस ठाण्यात गेली होती.