सत्कार करायला धनंजय मुंडे काय पराक्रमी योद्धा आहे का, तृप्ती देसाईंचा हल्लाबोल

धनंजय मुंडे यांचा सत्कार करायला ते पराक्रमी योद्धा आहेत का? त्यांचा जंगी सत्कार करणाऱ्यांची मानसिकता तपासायला पाहिजे | Dhananjay Munde

सत्कार करायला धनंजय मुंडे काय पराक्रमी योद्धा आहे का, तृप्ती देसाईंचा हल्लाबोल
धनंजय मुंडेंचा सत्कार करणाऱ्यांनी आपली मानसिकता तपासायला हवी; तृप्ती देसाईंचा हल्लाबोल
Follow us
| Updated on: Feb 03, 2021 | 6:52 PM

पुणे: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे लैंगिक अत्याचारप्रकरणात पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. रेणू शर्मा यांची बहीण करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी पहिल्यांदाच समोर येत धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ही माहिती समोर आल्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी धनंजय मुंडे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. धनंजय मुंडे यांचा सत्कार करायला ते पराक्रमी योद्धा आहेत का? त्यांचा जंगी सत्कार करणाऱ्यांची मानसिकता तपासायला पाहिजे, अशी टीका तृप्ती देसाई यांनी केली. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. (Trupti Desai take a dig at Dhananjay Munde after Karuna Sharma allegations)

तृप्ती देसाई या बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.  धनंजय मुंडे यांचे मोठे सत्कार आणि जल्लोषात स्वागत करताना काही लोक दिसत आहेत. धनंजय मुंडे हे पराक्रमी योद्धा असल्याप्रमाणे त्यांचे स्वागत केले जात आहे. परंतु त्यांनी विवाहबाह्य संबंध ठेवून त्यातून त्यांना दोन मुले आहेत याची कबुली त्यांनी स्वतःच दिलेली होती. त्यानंतर रेणू शर्मा यांनाच बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोकांकरवी झाला होता. त्यानंतर आज पुन्हा करुणा शर्मा यांनी जर असा तक्रारी अर्ज दिला असेल तर धनंजय मुंडे यांचे जल्लोषात स्वागत करणारे आणि मोठमोठे सत्कार करणाऱ्यांची मानसिकता आपल्याला तपासावी लागेल. हे असेच सुरु राहिले तर काही काळानंतर बलात्काराचे आरोप असलेल्या नेता आणि मंत्र्यांचे स्वागत करण्याचा चुकीचा पायंडा पडेल, अशी भीती तृप्ती देसाई यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेवर टीकास्त्र

राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षविस्तारासाठी लवकरच परिवार संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली ही यात्रा विदर्भातून सुरु होईल. हाच धागा पकडत तृप्ती देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले.

परिवार संवाद साधताना, राष्ट्रवादी पक्षातील मंत्र्यांचे परिवार सुरक्षित आहेत का, हे पण तपासले पाहिजे. त्याविरोधात राष्ट्रवादीतील सर्व महिला नेत्यांनी आवाज उठवला पाहिजे, असे मत तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले.

करुणा शर्मा यांचे आरोप काय?

करुणा शर्मा यांची गंभीर तक्रार आहे. करुणा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार, घरगुती हिंसाचार आणि इतर कलमांर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. इतकंच नाही तर आपल्या दोन्ही मुलांना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या चित्रकूट (Chitrakut) बंगल्याच्या मागच्या खोलीत 3 महिन्यापासून कोंडून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

संबंधित बातम्या  

अखेर रेणू शर्मांची बहीण करुणा यांनीही मौन सोडलं, धनंजय मुंडेंविरोधात गंभीर तक्रार

 करुणा शर्माबाबत धनंजय मुंडेंचा खुलासा, पण कोण आहेत करुणा शर्मा?

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी रेणू शर्मा कोण? 

महाराष्ट्रातील सर्वात मोठा गौप्यस्फोट, करुणासोबत परस्पर सहमतीने संबंधात दोन मुलं, धनंजय मुंडेंची कबुली 

(Trupti Desai take a dig at Dhananjay Munde after Karuna Sharma allegations)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.