Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून भाजप अन् अजित पवार गटात रस्सीखेच

Ajit Pawar and Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी रविवारी बंड पुकारले. त्यानंतर ते शिवसेना अन् भारतीय जनता पक्षासोबत आले. आता पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार? यावरुन चर्चा सुरु आहे.

पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून भाजप अन् अजित पवार गटात  रस्सीखेच
Chandrakant Patil and Ajit Pawar
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 11:27 AM

योगेश बोरसे, पुणे : राज्यातील राजकारणात गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहे. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसपासून अजित पवार यांनी आपला वेगळा गट तयार केला. अजित पवार शिवसेना-भाजप युतीसोबत आले. ते उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्यासोबत नऊ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार अन् या मंत्र्यांचे खातेवाटप अद्याप जाहीर झालेले नाही. त्यातच कोणाला कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळणार? या विषयावरसुद्धा चर्चा होत आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवार यांना देण्यास भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध आहे.

चंद्रकांत पाटील की अजित पवार

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सध्या चंद्रकांत पाटील आहेत. परंतु आता अजित पवार सरकारसोबत आल्यामुळे पुण्याचे पालकमंत्री कोण होणार? यावरून भाजप आणि अजित पवार गटात रस्सीखेच सुरु झाली आहे. भाजपकडून अजित पवार यांना पुण्याचे पालकमंत्रीपद देण्यास विरोध होत आहे. पुणे जिल्ह्यात भाजप आमदार आणि नगरसेवकांची संख्या जास्त असल्यामुळे पालकमंत्री पद भाजपकडे ठेवण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद अजित पवार यांच्याकडे गेल्यास भाजप बॅकफूटवर जाईल, अशी भीती भाजप कार्यकर्त्यांना आहे.

हे सुद्धा वाचा

पुणे शहरात राष्ट्रवादीत दोन गट

पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाले आहे. मंगळवारी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत शरद पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु बैठकीला अनेकांची दांडी होती. पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दोन्ही गटाकडून दावा केला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर कार्यालयाबाहेर पुणे पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे. नाशिकच्या घटनेनंतर पुणे पोलीस अलर्ट मोडवर आले आहे. शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुणे पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. राष्ट्रवादी कार्यालयाचा ताबा कुणी घेऊ नये यासाठी शरद पवार गटाचे कार्यकर्ते अलर्ट झाले आहे.

ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ.
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी.
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं...
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं....