उद्या देहूत रंगणार तुकाराम महाराज बीजत्सोव ; कार्यक्रमपत्रिका पहिली का?
देहू संस्थानच्या बीजत्सोवानिमित्त सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. मंदिर परिसरात एकूण 16 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. वैकुंठस्थान मंदिरातही सीसीटीव्ही कॅमेर्यांची नजर असेल. फायर ब्रिगेडच्या दोन गाड्या तैनात असतील. इंद्रायणीवरील पुल बंद केला जाणार आहे.
देहू – कोरोनाच्या(Corona) महामारीनंतर यंदा कोणत्याही निर्बंधाशिवाय देहूत (Dehu)उद्या (रविवारी )तुकाराम बीजेचा सोहाळा साजरा होणार आहे. यंदाचा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 374 वा वैकुंठ गमन सोहळा असणार आहे. या निमित्ताने देवस्थान प्रशासनाकडून(Devasthan administration) जोरात तयारी सुरु करण्यात आली आहे. याबरोबरच तुकाराम बीज कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. वैकुंठ स्थान मंदिर, मुख्य मंदिर आणि जन्मस्थान मंदिर या ठिकाणी कीर्तन होणार आहे. सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत वैकुंठ स्थान मंदिरासमोर भजनी मंडपात वैकुंठ सोहळा कीर्तन होईल. या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात वारकरी देहूत दाखल होणार आहेत.
सुरक्षेची संपुर्ण काळजी
देहू संस्थानच्या बीजत्सोवानिमित्त सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. मंदिर परिसरात एकूण 16 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. वैकुंठस्थान मंदिरातही सीसीटीव्ही कॅमेर्यांची नजर असेल. फायर ब्रिगेडच्या दोन गाड्या तैनात असतील. इंद्रायणीवरील पुल बंद केला जाणार आहे. इंद्रायणी नदीतील कोणीही जलचरांना काही खायला घालू नये, असे स्पष्ट आदेश आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांनी याबाबत माहिती दिली.
तुकाराम बीज सोहळा
पहाटे 3 – काकडा आरती. पहाटे 4 – मुख्य मंदिरात श्रींची महापूजा, व शाळा मंदिरातील महापूजा- संस्थांचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळ यांच्या हस्ते होईल. सकाळी 6 – वैकुंठ स्थान मंदिरात तुकाराम महाराजांची पूजा- तुकाराम महाराजांचे वंशज व वारकरी यांच्या हस्ते. सकाळी 10:30 – पालखी प्रस्थान ( वैकुंठ स्थान मंदिराकडे ) सकाळी 10 ते 12 – देहूकर महाराजांचे वैकुंठ सोहळा कीर्तन. 12:30 वा. पालखीचे वैकुंठ स्थान मंदिराकडून मुख्य मंदिराकडे आगमन.
‘जेवढं दडपण आणाल,तेवढी उसळी मारुन पुढे येईन’, Pravin Darekar यांचं ठाकरे सरकारला आव्हान
संजय राऊतांसह 6 खासदारांचा कार्यकाळ लवकरच संपणार, यादीत राज्यातल्या बड्या नेत्यांची नावं