आधी बिनविरोध निवडीचे फ्लेक्स, नंतर निवडणुकीची तयारी; ‘या’ ग्रामपंचायतीचा गोंधळात गोंधळ
जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा ग्रामपंचायत निवडणुकीवरून सध्या गोंधळाचं वातावरण सुरू आहे. (turmoil in gram panchayat election politics in junnar)
पुणे: जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा ग्रामपंचायत निवडणुकीवरून सध्या गोंधळाचं वातावरण सुरू आहे. काही कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बैठक बोलावली होती. बैठकीत विजयचा फॉर्म्युलाही ठरला आणि ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्याचे फ्लेक्सही लावले. मात्र, सत्ताधारी मंडळीने आम्हाला याबाबत काहीच माहीत नाही, असं सांगत हातवर केल्याने ग्रामपंचायत बिनविरोध निवडीचा गोंधळ समोर आला असून आता या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेते आमनेसामने उभे ठाकले आहेत. (turmoil in gram panchayat election politics in junnar)
पुणे जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आणि राष्ट्रवादीचे नेते पांडुरंग पवार यांची निमगाव सावा ग्रामपंचायत निवडणूक अटीतटीची होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. कारण अर्ज माघार घेण्याच्या आदल्या दिवशी काही लोकांनी निवडणूक बिनविरोध झाल्याचे फ्लेक्स गावात लावले होते. मात्र, स्थानिक सत्ताधारी मंडळीने आम्हाला या बाबत काहीच माहीत नसल्याचं सांगत उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे या ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
इतर ग्रामपंचायतीप्रमाणे आपल्याही गावातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून काँग्रेसच्या एका माजी पदाधिकाऱ्याने इच्छुक उमेदवारांची शनिवारी 2 जानेवारी रोजी गावात बैठक बोलावली होती. या बैठकीला सर्वपक्षीय मंडळी हजर होती. मात्र जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार आणि विद्यमान पंचायत समितीचे काही सदस्य यावेळी उपस्थित नव्हते. या सदस्यांच्या गैरहजेरीतही ही बैठक पार पडली आणि त्यात सत्ताधारी गटाला 8 आणि विरोधी गटाला 5 जागा देण्याचा फॉर्म्युला ठरवण्यात आला. त्यानंतर निवडणूक बिनविरोध झाल्याचं सांगत फटाक्याची आतषबाजीही करण्यात आली. तसेच निवडणूक बिनविरोध असे लिहिलेले फ्लेक्सही गावात लावण्यात आले.
दरम्यान, पांडुरंग पवार यांना या गोष्टीची कुणकुण लागताच त्यांनी अजून अर्ज मागे घेण्याची तारीख उलटलेली नाही. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झालेली नाही, असं जाहीर केलं. त्यामुळे स्थानिकांमध्ये गोंधळ उडाला. सोमवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सोमवारी काही लोक अर्ज मागे घेऊन निवडणूक बिनविरोध करतात की अर्ज कायम ठेवून निवडणुकीला सामोरे जातात हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, निमगाव सावा ग्रामपंचायतीच्या या सावळ्या गोंधळावर निवडणूक अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला. (turmoil in gram panchayat election politics in junnar)
VIDEO: TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 9 PM | 2 January 2021https://t.co/vKI6760EZZ#Top9News #NewsBulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 2, 2021
संबंधित बातम्या:
तुमच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर