Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील अमेरिकन व्यक्तीने शेतकऱ्यांसाठी बनवला मायक्रो सोलर पंप, शेतकऱ्यांची वर्षभरात किती होते बचत

Pune Farmer News : दोन अमेरिकन व्यक्ती भारतीय शेतकऱ्यांसाठी काम आहेत. भारतीय शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुणे शहरात त्यांनी एक स्टार्टअप उभारले आहे. त्या स्टार्टअपच्या माध्यमातून मायक्रो सोलर पंप विकसित केला आहे.

पुण्यातील अमेरिकन व्यक्तीने शेतकऱ्यांसाठी बनवला मायक्रो सोलर पंप, शेतकऱ्यांची वर्षभरात किती होते बचत
व्हिक्टर लेस्नीवस्की, कॅटी टेलर
Follow us
| Updated on: May 19, 2023 | 2:56 PM

पुणे : भारतीय अर्थव्यवस्थेचा डोलारा कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. देशातील कोट्यवधी लोकांसाठी शेती हा उपजिवेकेचे साधन आहे. अजून देश कृषीप्रधान म्हटला जातो. यामुळे सरकारबरोबर काही सामजिक संस्थांकडून शेतकऱ्यांसाठी सातत्याने काम केले जात आहेत. शेतकऱ्यांना उपयोगी पडणारे संशोधन केले जात आहे. गेल्या सात वर्षांपासून पुणे शहरात राहत असणाऱ्या दोन अमेरिकन व्यक्तींनी शेतकऱ्यांसाठी मायक्रो सोलर पंप तयार केला आहे. हा मायक्रो पंपमुळे शेतकऱ्यांच्या विजेच्या बिलात मोठी बचत होते आहे तर दुसरीकडे रोज घेऊन जाणे सोपे असल्यामुळे चोरच्या समस्येपासून सुटका झाली आहे.

आधी सुरु केला स्टार्टअप

मुळचे अमेरिकन असलेले कॅटी टेलर आणि व्हिक्टर लेस्नीवस्की यांनी खेतवर्क (Khethworks) नावाने स्टार्टअप सुरु केले. MIT मध्ये शिक्षण घेत असताना मास्टर पदवीच्या माध्यमातून ते टाटा ट्रस्टसोबत काम करु लागले. मग भारतीय शेतकऱ्यांसाठी त्यांनी स्टार्टअप सुरु केले. शेतकऱ्यांसाठी काम करण्यापूर्वी ते ओडिशा आणि झारखंडमधील शेतांमध्ये गेले. अनेक महिने त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद केला.

हे सुद्धा वाचा

साकारला मायक्रो सोलर पंप

शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर व्हिक्टर यांना अडचणी समजल्या. शेतीला पाणी पुरवठासाठी विजेची समस्या दिसली. तसेच सोलार पंपची शेतातून चोरी होण्याच्या घटना दिसल्या. मग त्यांनी यावर विचार सुरु केला. नवीन प्रकल्पावर काम सुरु केले. त्यासाठी फंडीग जमा केला. भारत सरकारकडून मायक्रो सोलर पंपचा आरखडा मंजूर करणे, पेटेंट घेणे, पुणे शहरात युनिट उभे करण्याचे काम त्यांनी केले. त्यानंतर मायक्रो सोलार पंप सुरु झाला.

९०० पंपची निर्मिती

खेतवर्क्सने आतापर्यंत ९०० पंपचे वाटप शेतकऱ्यांना केले. हा पंप मायक्रो असल्याने रोज शेतात घेऊन जाणे सोपे झाले. यामुळे सोलार पंपची चोरीची समस्या सुटली. हा पंप महिलाही सहज घेऊन जाऊ शकतात. या पंपमुळे शेतकऱ्यांचे वर्षातील दहा ते बारा हजार रुपये विजेचे बील वाचत आहे. अनेक शेतकरी या पंपचा वापर करु लागले आहे. विदेशातील लोकांनी भारतीय शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या या स्टार्टअपचे कौतूक होत आहे.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.