Uddhav Thackeray : शिवसेनेचं हिंदुत्व आता ओळखायचं कसं? गिरीश कुबेरांच्या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी सविस्तर दिलं

आमचे अस्तित्व आहे, हे ज्यांना दाखवावे लागते, त्यांना ते दाखवू द्या. त्यांचा तो अधिकार आहे. कधी मशिदीतून बाहेर पडतानाचे फोटो आहेत, कधी मराठी माणसांसोबतचे फोटो आहेत, कधी हिंदुंसोबतचे फोटो आहेत. मी कशाला लक्ष देऊ, असा टोला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

Uddhav Thackeray : शिवसेनेचं हिंदुत्व आता ओळखायचं कसं? गिरीश कुबेरांच्या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी सविस्तर दिलं
हिंदुत्वावरून राज ठाकरेंवर टीका करताना उद्धव ठाकरेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 1:37 PM

मुंबई : शिवसेना हिंदुत्ववादी (Hindutva) पक्ष आहे. शिवसेनेचे हिंदुत्व ओळखण्याची गरजच नाही. शिवसेनाप्रमुखांनी सांगितले होते हिंदुत्व आमचा श्वास आहे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मांडत विरोधकांसह राज ठाकरेंचा समाचार घेतला. लोकसत्ताचे संपादक गिरीष कुबेर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली, त्यात त्यांनी विविध मुद्द्यांना स्पर्ष केला. यावेळी शिवसेनेचे हिंदुत्व ओळखायचे कसे, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, की आम्हाला सारखा हिंदुत्वाचा डंका वाजवावा लागत नाही. का तुम्हाला तुमची ओखळ सांगावी लागते, का तुम्हाला तुमचे झेंडे (Flag) फडकवावे लागतात? कधी या रंगाचा तर कधी त्या रंगाचा झेंडा. आमचा झेंडा आम्ही कधीही बदलला नाही, असा टोला त्यांनी राज ठाकरे यांना लगावला.

‘अस्तित्व दाखवावे लागते, तो त्यांचा अधिकार’

आमचे अस्तित्व आहे, हे ज्यांना दाखवावे लागते, त्यांना ते दाखवू द्या. त्यांचा तो अधिकार आहे. कधी मशिदीतून बाहेर पडतानाचे फोटो आहेत, कधी मराठी माणसांसोबतचे फोटो आहेत, कधी हिंदुंसोबतचे फोटो आहेत. मी कशाला लक्ष देऊ, असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. आता मार्केटिंगचा जमाना आहे. नाही पसंत पडले तर परत करा. फळले तर फळले नाही तर परत. हे असेच भोंगेधारी पुंगीधारी खूप बघितलेत. आम्ही मराठी मग बाकीच्यांना हकलून द्या, मग ते फसले की आम्ही हिंदू. इतरांना घरात बोलवायचे. हे जे चाळे चालतात त्यांना माकड चाळे म्हणतात. महाराष्ट्रातील जनता नासमज नाही, असा हल्ला त्यांनी राज यांच्यावर चढवला.

भोंग्यांचा मुद्दा गौण

नोटाबंदी, लॉकडाऊन देशभर केली तशी भोंगाबंदी देशभर करा, असे आवाहन त्यांनी केंद्र सरकारला केली आणि भोंग्यांवरून राजकारण करणाऱ्यांना चपराक लगावली. भोंग्यांचा मुद्दा सुप्रीम कोर्टात आहे. न्यायालयाने निकाल दिल्यानुसार भोंगे सुरू आहेत. त्यामुळे भोंग्यांचा विषय गौण असून विकास हा मुद्दा आमच्यासमोर महत्त्वाचा आहे.

‘अस्मिता टिकवण्याची गरज’

हिंदुत्वाच्या दावेदार या शब्दावरही त्यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, की शिवसेना आणि हिंदुत्वाचा दावेदार मुळात दावेदार हा शब्दच चुकीचा आहे. हिंदुंना असमर्थ किंवा नासमज समजू नका. त्यांना सर्व कळते. हिंदु म्हणजे कोण परदेशातून आलेले नाहीत. आपल्याकडे हिंदू अनेक भाषा बोलतात. प्रत्येकाची अस्मित आहे. ती टिकवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.