निवडणुकांबाबत राज्यपाल मुख्यमंत्र्यांना सूचना करू शकतात का?; वाचा, तज्ज्ञ काय म्हणतात!

| Updated on: Jul 01, 2021 | 4:10 PM

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहून काही सूचना केल्या आहेत. त्यावरून राजकीय टोलेबाजी सुरू झाली आहे. (Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari)

निवडणुकांबाबत राज्यपाल मुख्यमंत्र्यांना सूचना करू शकतात का?; वाचा, तज्ज्ञ काय म्हणतात!
Governor Bhagat Singh Koshyari
Follow us on

पुणे: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहून काही सूचना केल्या आहेत. त्यावरून राजकीय टोलेबाजी सुरू झाली आहे. मात्र, या पत्रातून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना निवडणुकांबाबत काही सूचना केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यपालांना मुख्यमंत्र्यांना निवडणुकांबाबत सूचना करण्याचे अधिकार आहेत का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. (ulhas bapat reaction on Bhagat Singh Koshyari’s letter to cm uddhav thackeray)

प्रसिद्ध घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी या कायदेशीरबाबीवर प्रकाश टाकला आहे. निवडणूक घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाचा आहे. मुख्यमंत्र्यांचा नाही. त्यामुळे राज्यपाल मुख्यमंत्र्यांना निवडणूक घेण्याबाबत सूचना करू शकत नाहीत, असं उल्हास बापट यांनी सांगितलं.

म्हणून राज्यपालांवर संशयाची सुई

यावेळी बापट यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरही भाष्य केलं. घटनेनुसार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात होण्याची गरज आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. तर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना जे पत्रं लिहिलं ते भाजपनेच राज्यपालांना पाठवायला सांगितल्याची संशयाची सुई आहे, असं ते म्हणाले. विधानपरिषदेच्या 12 जागांची नेमणूक राज्यपालांनी अद्याप केली नाही. त्यामुळे राज्यपालांचं वागणं घटनाबाह्य आहे, असं त्यांनी सांगितलं.

दोन दिवसांचा कालावधी पुरेसा

विधान मंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनीही विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर प्रकाश टाकला आहे. अध्यक्षचा निवडणुकीची तारीख कॅबिनेट निश्चित करते. त्यानंतर ती तारीख राज्यपालांना कळवली जाते. त्यानंतर राज्यपाल ही तारीख विधानमंडळाच्या प्रधान सचिवांना कळवतात. तसेच त्यांना निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देतात. पूर्वी प्रथेप्रमाणे 7 दिवसांची नोटीस द्यावी लागायची. कारण तेव्हा सदस्यांना पोस्टाद्वारे कळवायला लागायचं. पण आता टेक्नॉलॉजी वाढलेली आहे. आता ई-मेलद्वारे किंवा टीव्हीवरून बातम्यांद्वारे कळवता येत. किमान एक किंवा दोन दिवसांची मुदत सदस्यांना द्यावी अशी अपेक्षा असते. दोन दिवसांचा कालावधी अध्यक्ष निवडणुकीसाठी पुरेसा आहे, असं कळसे म्हणाले.

राज्यपालांनी काय म्हटलं होतं?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहिलं होतं. त्यात त्यांनी जिल्हा परिषद निवडणुका स्थगित करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांना केली होती. त्यामुळे निवडणुका घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा असताना राज्यपाल त्यांना आदेश कसे देऊ शकतात? असा सवाल केला जात होता. (ulhas bapat reaction on Bhagat Singh Koshyari’s letter to cm uddhav thackeray)

 

संबंधित बातम्या:

देवेंद्र फडणवीसांच्या तिन्ही मागण्या महत्त्वाच्या, त्याबाबत कारवाई करा, राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

ओबीसी राजकारणावर भाजपकडून सत्ताधारी चेकमेट, ‘त्या’ जागांवर फक्त ओबीसी उमेदवार देण्याचीच फडणवीसांची घोषणा

ठाकरे सरकार कायद्याने चालत नाही हे राष्ट्रपतींना कळवा, फडणवीसांची राज्यपालांना विनंती

(ulhas bapat reaction on Bhagat Singh Koshyari’s letter to cm uddhav thackeray)