खड्डे मुक्तीसाठी अनोखी शक्कल; शहरातील खड्ड्यांवर आता पुणे पोलिसांची करडी नजर; करणार अशी कारवाई

Pune Pothole Police Action : राज्यातील अनेक शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. काही भागात मुसळधार पावसाने कहर केल्याने रस्त्यात खड्डे की, खड्यात रस्त्यात अशी परिस्थिती आहे. त्यातच पुण्यातील रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी एक अनोखी शक्कल लढविण्यात आली आहे.

खड्डे मुक्तीसाठी अनोखी शक्कल; शहरातील खड्ड्यांवर आता पुणे पोलिसांची करडी नजर; करणार अशी कारवाई
पुण्यातील खड्ड्यांची रांगोळी, पोलिसांची कडक ॲक्शन
Follow us
| Updated on: Aug 02, 2024 | 11:14 AM

राज्यातील अनेक शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्यांवरुन वाट काढताना वाहनधारकांची तारांबळच उडते असे नाही तर कसोटी लागते. त्यातच मुसळधार पावसाने मोठ्या शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांची रांगोळी काढली आहे. पुण्यात पण अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्त्यांवरील खड्डे चुकविताना अपघाताला पण निमंत्रण मिळते. त्यामुळे पुणे पोलीस ॲक्शन मोडवरआहेत. पुण्यातील खड्ड्यांवर पण पोलिसांची करडी नजर आहे.

पोलिसांची करडी नजर

पुणे शहरातील खड्ड्यांवर आता पुणे पोलिसांची करडी नजर आहे. लवकररात लवकर खड्डे बुजवा नाही तर पुणे पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत. पुणे महापालिकेच्या अभियंता, ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे. खड्डे बुजवले नाही तर पुणे महापालिकेच्या ठेकेदार, अभियंता यांच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत.

हे सुद्धा वाचा

रस्त्यांवर ५४४ खड्डे

गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसाने शहरातील अनेक रस्त्यांची चाळण केली आहे. पुणे शहरात खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. पुण्यातील ३१७ जंक्शन वर तब्बल ५४४ खड्डे असल्याचे समोर येत आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर अनेक खड्ड्यांची जणू एक माळच तयार केली आहे. यामुळे शहरातील वाहनांचा वेग कमी झाला आहे. शहरातील काही भागात वाहतूक कोडींचा सामना करावा लागत आहे. तर खड्ड्यातील दणक्यांमुळे वाहनधारकांची हाडं खिळखिळी होत आहे. इतके खड्डे असून महापालिकेच्या पथविभागाला हे खड्डे काही केल्या दिसत नसल्याचे चित्र आहे. त्यांच्या लेखी शहरात अवघे ५३ खड्डे आहेत. त्यामुळे पुणेकरांनी संताप व्यक्त केला आहे.

तक्रार आली तर मलमपट्टी करणार

पुण्यातील अनेक रस्त्यांवर खड्डे असताना पथ विभागाने मात्र अजब भूमिका घेतली आहे. हेल्पलाईन क्रमांकावर कॉल केल्यास अथवा ऑनलाईन तक्रार आल्यास खड्डा बुजविण्याची प्रक्रिया केली जात असल्याचे समोर येत आहे. म्हणजे रस्त्याची चाळण झालेली असली तरी तक्रार येत नसल्याने खड्डे न बुजविण्याचा प्रताप समोर आला आहे. यावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.